Electric Bike : ‘या’ दमदार इलेक्ट्रिक बाईकची डिलिव्हरी सुरु; 187 KM रेंज, किंमत किती?

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Bike) खरेदीकडे जास्त वाढला आहे. त्यामुळे मार्केट मध्येही इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रत्येक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बनवण्यामध्ये त्यांचे लक आजमावत आहे. आता अशीच इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकचं नाव ओबेरॉन रोहरर असून बेंगलोर बेस्ट इलेक्ट्रिक वेहिकल स्टार्टअप ओबेनने तयार केली आहे. ही बाईक शानदार लुक आणि फीचर्स सह मार्केटमध्ये उतरली आहे. कंपनीने या बाइकची डिलिव्हरीही सुरू केली आहे. आतापर्यंत या बाईकचे 25 मॉडेल्स डिलिव्हर केले गेले आहेत.

   

किंमत किती?

मागील महिन्यापासून इलेक्ट्रिक वाहनांच्या सबसिडीमध्ये घट करण्यात आल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Bike) विक्रीमध्ये घट पाहायला मिळाली. ओबेन रोर ही बाईक ग्राहकांनी मोठ्या संख्येने विकत घेतली. बेंगलोरमध्ये एचएसआर लेआउट येथील एक्सपिरीयन्स सेंटरमध्ये ओबेन रोर बाईकची विक्री करण्यात आली होती. ओबेन रोर या इलेक्ट्रिक बाइक ची शोरूम किंमत 1,49,999 रुपये एवढी आहे. तसेच या बाईकला खरेदी करण्यासाठी 21,000 प्री ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळे कंपनीकडून शोरूम्स आणि सर्विस सेंटर उभारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कंपनीकडून देशांमध्ये 12000 पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ओबेर रोर ही बाईक कबीरा स्कूटर्स KM 3000/4000, रिवोल्ट मोटर्स RV 400, अर्थ एनर्जी इव्ही इ्व्हॉल्व R, प्योर इव्ही e Trist 350 या वाहनांसोबत स्पर्धा करेल .

काय आहेत फीचर्स – (Electric Bike)

ओबेन रोर इलेक्ट्रिक बाइक मध्ये 4.4 kwh बॅटरी देण्यात आलेली असून या बाईक मध्ये 8 किलो वॅट ची मोटर देण्यात आली आहे. या मोटर वर तीन वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक बाईक तब्बल 187 किलोमीटर रेंज देते. टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास असून 3 सेकंदात 0.40 km/ प्रति तास वेग वाढवण्यास ही इलेक्ट्रिक बाईक सक्षम आहे. सध्या कंपनीने या इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) वर 50 हजार किलोमीटर आणि 3 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे. परंतु येत्या काळात ती वाढवून 75 हजार किलोमीटर किंवा पाच वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते.