Electric Bike : 248 KM रेंज देतेय ही Electric Bike; बाजारात घालणार धुमाकूळ

टाइम्स मराठी । अमेरिकी इलेक्ट्रिक मोटरसायकल मॅन्युफॅक्चर कंपनी ZERO ने इटली येथे सुरू असलेल्या EICMA 2023 या शोमध्ये ZERO S 2024 एडिशन सादर केले आहे. 2023 ला लॉन्च करण्यात आलेल्या ZERO S या स्कूटर पेक्षा दमदार बॅटरी या नवीन एडिशन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. ZERO S 2024 Electric Bike भारतीय बाजारपेठेमध्ये देखील लॉंच करण्यात येऊ शकते. कारण कंपनीने भारतामध्ये इलेक्ट्रिक मोटरसायकल बनवणाऱ्या हिरो मोटोकॉर्प सोबत पार्टनरशिप केली आहे. ZERO S 2024 या सादर करण्यात आलेल्या  इलेक्ट्रिक बाइक चा लुक आणि डिझाईन अप्रतिम आहे. जाणून घेऊया या बाईकचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

248 किलोमीटर रेंज – Electric Bike

ZERO S 2024 या Electric Bike मध्ये जुन्या मॉडेल पेक्षा दुप्पट क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. त्यानुसार यामध्ये 14.4  kwh बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी 132 nm पीक टॉर्क जनरेट करते. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी ब्रँड कडून लेव्हल 2 चार्जर देण्यात येणार आहे. जेणेकरून बॅटरी 4 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होईल. जर ग्राहकांना फास्ट चार्जर हवे असेल तर कंपनीजवळ रॅपिड चार्जर देखील उपलब्ध आहे. रॅपिड चार्जरच्या माध्यमातून 1.30 तासांमध्ये 95% बाईक चार्ज होऊ शकते. आणि  स्टॅंडर्ड चार्जर च्या मदतीने 9.2 तासात 95 टक्के चार्ज होऊ शकते. गाडीच्या रेंज बद्दल सांगायचं झाल्यास ही इलेक्ट्रिक बाईक सिटीमध्ये मॅक्झिमम 248 किलोमीटर आणि हायवे वर 182 किलोमीटर पर्यंत रेंज देते.

डिझाईन

ZERO S 2024 या इलेक्ट्रिक बाइकच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, डिझाईन मध्ये कंपनीने बरेच बदल केले आहेत. यामध्ये LED लाईट आणि टॅंक च्या आकारांमध्ये बदल करण्यात आले आहे. जेणेकरून आकर्षक आणि स्टायलिश लुक  बाईकला मिळतो.  यामध्ये 787 mm कम्फर्टेबल सीट सोबतच हाईट देण्यात आली आहे.