Electric Car Insurance। काही वर्षांपासून पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याचबरोबर वाढते प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा जास्त कल दिसून येत आहे. त्यामुळे सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करत आहेत. इलेक्ट्रिक वाहन हे बॅटरीवर चालत असल्यामुळे शून्य प्रदूषण निर्माण होते. परंतु इलेक्ट्रिक वाहन तुम्ही विना विम्याशिवाय भारतीय रस्त्यांवर चालवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला विमा पॉलिसी काढणे अत्यंत गरजेचे आहे. इलेक्ट्रिक कार या पेट्रोल डिझेल वाल्या कार पेक्षा प्रचंड महाग असतात. त्यामुळे या इलेक्ट्रिक वाहनांचे नुकसान, चोरी झाल्यास परवडणारे नसते. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांचा विमा महाग असल्याची बरेच कारणे आहेत. ती आपण आज जाणून घेणार आहोत.
Electric Car चा विमा महाग असल्याची कारणे खालीलप्रमाणे-(Electric Car Insurance)
इलेक्ट्रिक कार महाग असल्यामुळे इलेक्ट्रिक कारचा विमा देखील महाग आहे.
इलेक्ट्रिक कार आरामदायक पद्धतीने डिझाईन केली आहे. यामध्ये महाग आणि नवीन टेक्नॉलॉजी डिझाईन करण्यात आली आहे.
वाहनांच्या किमतींचा परिणाम हा विमा पॉलिसी मध्ये देखील होत असतो. यामध्ये विमा घोषित मूल्य म्हणजेच IDV यात होत असल्यामुळे विम्यासाठी जास्त प्रीमियम भरावा लागतो.
इलेक्ट्रिक कार लिथियम आयन बॅटरी वर चालतात. परंतु या बॅटरी बदलण्याची किंमत ही कारच्या एकूण किमतीच्या निम्मी आहे. म्हणजेच या इलेक्ट्रिक कार्स ची बॅटरी दुरुस्त करणे किंवा बदलणे अत्यंत महाग असल्यामुळे विमा कंपन्या इलेक्ट्रिक कार देण्यासाठी जास्त प्रीमियम घेतात. इलेक्ट्रिक कार मध्ये जरी पेट्रोल डिझेलचा खर्च वाचत असला तरी बॅटरी दुरुस्ती आणि बदलीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो.
इलेक्ट्रिक कार दुरुस्त करण्यासाठी अद्वितीय कौशल्य आणि तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. हे ज्ञान असलेला व्यक्ती किंवा मेकॅनिक शोधणे खूप कठीण आहे. अशातच पेट्रोल डिझेलच्या कार साठी मेकॅनिक आणि तज्ञ सहजपणे मिळतात परंतु इलेक्ट्रिक वाहनांसाठी हे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे यासाठी येणारा खर्च मेकॅनिक खूप जास्त प्रमाणात घेतो. त्यामुळे विमा कंपन्या इलेक्ट्रिक कारच्या विम्यासाठी (Electric Car Insurance) जास्त शुल्क आकारतात.