भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार ही Electric Car; 600 KM रेंज

टाइम्स मराठी । लक्झरी आणि इलेक्ट्रिक SUV बनवणारी ब्रिटिश कंपनी LOTUS CARS ने भारतामध्ये एंट्री गेली आहे. या कंपनीने भारतात दिवाळीनिमित्त  Electric SUV कार लॉन्च केली. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या कारचे नाव Lotus Eletre R आहे. कंपनीने ही कार तीन व्हेरिएन्टमध्ये लॉन्च केली आहे. याशिवाय भारतीय बाजारपेठेमध्ये कंपनीकडून 2024 च्या सुरुवातीला LOTUS EMIRA ही कार लॉन्च करण्यात येणार आहे. ही कार आकर्षक डिझाईन आणि अप्रतिम फीचर्स मध्ये उपलब्ध आहे. जाणून घेऊया या कारचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

किंमत

Lotus Eletre R या कारमध्ये कंपनीने ३ व्हेरिएंट उपलब्ध केले आहे. या तिन्ही व्हेरियंटचे नाव, LOTUS ELETRE, LOTUS ELETRE S आणि LOTUS ELETRE R आहे. त्यानुसार तिन्ही व्हेरियंटच्या किमती देखील वेगवेगळ्या आहेत. LOTUS ELETRE  या कारची एक्स शोरूम किंमत 2.55 करोड रुपये एवढी आहे. यासोबतच LOTUS ELETRE S या व्हेरिएंट च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, 2.75 करोड रुपये आहे. LOTUS ELETRE R ची किंमत 2.99 कोटी ठेवण्यात आली आहे.

केबिन फीचर्स

या कारमध्ये वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग, सीट ऍडजेस्ट, 4 जोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच केबिनमध्ये 15.1 इंच चा फ्लोटिंग इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, प्रवाशांसाठी तिसरा डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करतो.

फीचर्स

Lotus Eletre R या कारच्या लुक बद्दल बोलायचं झालं तर ही कार स्पोर्टी लूक मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये स्लिक L आकारांमध्ये LED  हेडलाइट्स मोठे फ्रंट एयर डॅम देण्यात आले आहे. ज्यामुळे कारला आक्रमक लुक मिळतो. याशिवाय कार मध्ये स्लोपिंग रूफलाईन , 5 स्पोक अलॉय व्हील्स, रेक्ट टेलगेट, स्लीक कनेक्टेड LED टेललॅम्प  आक्रमक बंपर मिळते. या कार मध्ये मोट्स ऍक्टिव्ह फ्रंट ग्रील आणि 22 इंच 10 स्पोक व्हील्स देण्यात आले आहे.

पावरट्रेन

ही कार भारतात दोन पॉवरट्रेन ऑप्शन मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्यानुसार कार च्या तिन्ही व्हेरिएंट मध्ये ड्युअल मोटर सेटअप एक बॅटरी पॅक देण्यात आला आहे. यात 12kwh बॅटरी यामध्ये  मिळते. ही बॅटरी एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 600 किलोमीटर रेंज देते. या कारच्या टॉप स्पीड बद्दल बोलायचं झालं तर, प्रतितास 258 किलोमीटर स्पीड पकडते. ही इलेक्ट्रिक कार 4.5 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडते.