Electric Car : Renault लवकरच लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार; 397 KM पर्यत रेंज मिळणार

Electric Car। भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात आहे. वाढते पेट्रोल डिझेलचे भाव आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहन मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. याशिवाय इलेक्ट्रिक गाड्यांचा लूक आणि फिचर आजच्या तरुण पिढी सोबतच जेष्ठाना देखील आकर्षित करतात. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून बऱ्याच वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये लक आजमावत आहे. त्यानुसार आता फ्रांस ची कार निर्माता कंपनी Renault देखील नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार आता कंपनीने अपकमिंग Renault 5 E-Tech या EV कारचा टीजर लॉन्च केला आहे. 

   

या टीजर मध्ये कंपनीने या EV कारची इमेज उपलब्ध केली असून या कारचे कॉन्सेप्ट प्रोटोटाइप पहिल्यांदा 2021 ला सादर करण्यात आले होते. या टीजर इमेजच्या माध्यमातून EV बद्दल महत्वाची माहिती हाती आली आहे. या अपकमिंग EV कारचे ग्लोबल प्रीमियम 26 फेब्रुवारीला जिनेवा इंटरनेशनल मोटर शो मध्ये करण्यात येणार आहे.  

लाईट्स – Electric Car

या लॉन्च करण्यात आलेल्या टीजर इमेज मध्ये दाखवल्या प्रमाणे EV कारमध्ये देण्यात आलेले LED हेडलाईट्स रेटिना या कारच्या हेडलाईट्स प्रमाणे दिसत आहे. या कारच्या बोनट वर  एक चार्ज्ड इंडिकेटर लाईट देण्यात आला आहे. हा लाईट एयर इंटेकच्या जागेवर स्थित असून कार पूर्णपणे चार्ज्ड झाल्यावर हा इंडिकेटर लाईट लागतो. 

व्हील आर्च

या Electric Car मध्ये देण्यात आलेले व्हील आर्च अतिशय आकर्षक आहे. हे आर्च कॉम्पॅक्ट डायमेन्शन मध्ये असले तरीही ब्रॉडर स्टार्स देतात. त्याचबरोबर या EV कारच्या व्हर्टिकल टेललाईट बद्दल बोलायचं झालं तर हे टेल लाईट्स सी पिलर मध्ये देण्यात आले आहे. हे खासकरून टर्ब्युलन्सला थांबवून R5 एयरोडायनॅमिक परफॉर्मन्स मध्ये योगदान देते.

बॅटरी 

या अपकमिंग Electric Car मध्ये 52 kWh बॅटरी देण्यात येऊ शकते. ही बॅटरी WLTP टेस्ट प्रोटोकॉल नुसार पूर्णपणे चार्ज झाल्यास 397 KM पर्यत रेंज देईल. ही कार कंपनीने नवीन AMPR स्मॉल प्लॅटफॉर्म वर आधारित आहे. या प्लॅटफॉर्म ला पूर्वी CMF B EV नावाने ओळखले जात होते. तसेच Renault 5 E-Tech द्वि दिशात्मक ऑनबोर्ड चार्जरने सुसज्ज आहे.

V2G टेक्नॉलॉजी ने सुसज्ज 

रेनॉल्ट कंपनीची ही अपकमिंग नेक्स्ट जनरेशन कार उच्च प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी कार असेल. ही इलेक्ट्रिक कार V2G म्हणजेच वाहन टू ग्रीड टेक्नॉलॉजी उपलब्ध असलेल्या ब्रँड चे पहिले वाहन असेल. ही टेक्नॉलॉजी ग्रीडला पावर पुरवण्यासाठी परवानगी देते. यामुळे चार्जिंग वर पैसे वाचण्यास मदत होते.