टाइम्स मराठी । आज काल इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Car) चलती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच अनेक वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवण्यात आपले लक आजमावत आहे. अशातच सप्टेंबर महिन्यामध्ये या ऑटोमोबाईल कंपन्या ४ इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. तुम्ही देखील इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या सप्टेंबर महिन्यात लॉन्च होणाऱ्या कारच्या किमती आणि फीचर्स याबाबत सविस्तरपणे….
1) Tata Nexon Facelift EV
टाटा कंपनीची नेक्सन इलेक्ट्रिक कार (Electric Car)असून ही कार मिडीयम रेंज आणि लॉन्ग रेंज या दोन्ही वर्जन मध्ये करण्यात येणार आहे. टाटा नेक्सन या कारची विक्री कंपनीने सुरुवातीलाच केली असून या कारचे अपडेटेड व्हेरीएन्ट कंपनी लॉन्च करणार आहे. ही इलेक्ट्रिक कार 14 सप्टेंबरला लॉन्च करण्यात येणार असून तिची किंमत 15 लाख रुपयांपर्यंत असू शकते. टाटा नेक्सन ईव्ही फेसलिफ्ट ही कार टियागो ईव्हीच्या स्वरूपात लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात येणार असून रेंज ऑप्शन देखील उपलब्ध असेल. यासह इव्ही कार मध्ये 10.25 इंच चा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात येणार आहे.
नेक्सन ईव्ही फेसलिफ्ट या कारमध्ये दमदार इंजिन बसवण्यात आलेले असून हे इंजिन 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये मेकॅनिकल अपग्रेडच्या माध्यमातून 7 स्पीड ऑटोमॅटिक गेअर बॉक्स देखील देण्यात आले आहे. यामध्ये ट्रान्समिशन लाइन अप साठी 5 स्पीड मॅन्युअल 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड एएमटी युनिट देण्यात आले आहे.
2) BMW iX1– (Electric Car)
सप्टेंबर महिन्यात लॉन्च होणारी दुसरी इलेक्ट्रिक कार म्हणजेच बीएमडब्ल्यू iX1… ही इलेक्ट्रिक कार 15 सप्टेंबरला लॉंच करण्यात येणार आहे. या कारची किंमत 60 लाख रुपये एवढी आहे. कंपनी बीएमडब्ल्यूचे दोन इलेक्ट्रिक मॉडेल या वर्षी करणार असून हे मॉडेल हे लक्झरी लूक प्रदान करतात. हे दोन्ही मॉडेल पेट्रोल आणि डिझेलमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. बीएमडब्ल्यू iX1 या इलेक्ट्रिक कार मध्ये 64.7 किलोवॅट बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी फक्त 29 मिनिटांमध्ये 80 टक्के चार्ज होते. एवढेच नाही तर एकदा ही बॅटरी चार्ज केल्यानंतर 439 किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. या कार मध्ये 10.7 इंच चा इनपुट एलिमेंट सिस्टीम, 10.25 इंच डिस्प्ले, ADAS टेक्नॉलॉजी, 12 स्पीकर, हरमन कार्डोन ऑडिओ सिस्टीम, वायरलेस एप्पल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.
3)Vovlo C 40 रिचार्ज –
सप्टेंबर महिन्यात लॉन्च होणारी तिसरी इलेक्ट्रिक कार (Electric Car) म्हणजे वोल्वो सी 40 रिचार्ज . वोल्वो सी 40 रिचार्ज ची किंमत 60 लाख रुपये एवढी आहे. वोल्वो कंपनीची ही कार एक इलेक्ट्रिक SUV कार आहे. यामध्ये देण्यात आलेल्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये एलईडी लाईट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नऊ इंच चा इम्फोटेनमेंट सिस्टीम, एबिएंट लाइटिंग , बेस्ट लेदर इंटेरियर, पॅनोरमिक सन रूफ, ऑटो क्लायमेट कंट्रोल, हिट सीट यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक कार 18 सप्टेंबरला लॉंच करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही 78 के डब्ल्यू एच लिथियम आयन पॅक सह उपलब्ध आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार तब्बल 530 किलोमीटर पर्यंत रेंज देते. ही कार 480 एचपी पावर आणि 660 nm पीक टॉर्क जनरेट करते.
4) मर्सिडीज बेंज इक्यूएस एसयुव्ही
सप्टेंबर महिन्यात लॉन्च करण्यात येणारी चौथी कार मर्सिडीज बेंज इक्यूएस एसयुव्ही ही 20 सप्टेंबरला लॉन्च करण्यात येणार आहे. या कार मध्ये 90.6 kwh बॅटरी पॅक देण्यात आला असून ही बॅटरी 170 KW च्या डीसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये सिंगल मोटर , रियर व्हील ड्राईव्ह सेटअप देण्यात आलेला असून 292 hp पावर आणि 565 nm पीक टॉर्क जनरेट करते. यासोबतच या कारच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर ही कार 2 करोड रुपयात खरेदी करता येऊ शकते.