टाइम्स मराठी । सध्या देशात इलेक्ट्रिक वाहन मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत . इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता मॅन्युफॅक्चरर कंपन्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा शोध लावत आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टिकण्यासाठी एका पेक्षा एक वरचढ इलेक्ट्रिक वाहन डेव्हलप करत आहेत. यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग ही महत्त्वाच आहे. वाहन चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांसोबत चार्जर दिले जाते. या चार्जर च्या माध्यमातून घरी आणि बाहेर असल्या चार्जिंग स्टेशनच्या माध्यमातून वाहन चार्ज करता येते. परंतु आता वाहन चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन शोधण्याची गरज नाही. आता सिग्नल वर रेड लाईट लागल्यानंतर आपोआप इलेक्ट्रिक वाहन चार्ज होऊ शकते.
काय आहे ही टेक्नॉलॉजी
जपानच्या कशीवनोहा या शहरामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी आणि वायरलेस चार्जिंग सुविधा मिळावी यासाठी इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून पायलेट प्रोजेक्ट चालू करण्यात येत आहे. या पायलेट प्रोजेक्टच्या माध्यमातून सिग्नल वर रेड लाइट च्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन चार्ज होऊ शकतील. सध्या या टेक्नॉलॉजी ची टेस्टिंग सुरू आहे. परंतु लवकरच आपल्याला ही सुविधा देखील मिळू शकते. जेणेकरून इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढेल.
अशा पद्धतीने करेल काम
हा पायलट प्रोजेक्टमध्ये मोशन लाईट सप्लाय च्या माध्यमातून गाडी चार्ज होते. यामध्ये वापरण्यात येणारे चार्जिंग कॉइल्स हे पृष्ठभागावर लावण्यात आले आहे. जेणेकरून त्याठिकाणी इलेक्ट्रिक वाहन उभे राहिल्यास चार्जिंग करंट फ्लो होतो. यासाठी गाड्यांच्या टायर मध्ये एक डिवाइस वापरण्यात आले आहे. हे डिवाइस इलेक्ट्रिसिटीला गाडीच्या बॅटरी पर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. परंतु इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी गाडीचे स्पीड कमी असणे गरजेचे आहे आणि गाडी एका ठिकाणी उभी असणे देखील महत्वाचे आहे.
दहा सेकंदात होईल एवढी चार्ज
पायलट प्रोजेक्ट टोकियो विश्व विद्यालय यांच्या माध्यमातून सुरू आहे. सध्या या टेक्नॉलॉजीची ॲबिलिटी कंटिन्यू चार्जिंग क्षमता, ड्यूरीबिलिटी टेस्टिंग सुरू आहे. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कार 10 सेकंदामध्ये एक किलोमीटर एवढी चार्ज होते. म्हणजेच ट्राफिक सिग्नल वर कार एका मिनिटासाठी थांबली तर 6 किलोमीटर पर्यंत ही कार चालू शकते.