Electric Car : फक्त 1.25 लाख रुपयांत मिळतेय ही इलेक्ट्रिक कार; 150 KM रेंज

टाइम्स मराठी । आज-काल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात आहे. त्यानुसार बऱ्याच ऑटोमोबाईल वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या बनवण्यामध्ये त्यांचे लक आजमावत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती तस पाहिले तर काही प्रमाणात महाग असल्याने अनेकांना इच्छा असूनही खरेदेई करता येत नाहीत. परतू आता ग्राहकांना खुश करण्यासाठी YAKUZA या कंपनीने सर्वात स्वस्त अशा इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. या कारची किंमत फक्त 1.25 लाख रुपये आहे. म्हणजेच बाईकच्या किमतीत ही इलेक्ट्रिक कार तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. YAKUZA कंपनीची मिनी इलेक्ट्रिक कार ही भारतातील सर्वात स्वस्त कार बनली आहे. यामध्ये देण्यात आलेले अप्रतिम फीचर्समुळे या कारकडे सर्वजण आकर्षित होत आहे.

   

फिचर्स

Yakuza Electric Car ही नॅनो प्रमाणे डिझाईन करण्यात आली आहे. त्यामुळे या कारला दुसरी नॅनो देखील बरेच जण म्हणतात. या मिनी कार मध्ये पुश बटन, सनरुफ, टच स्क्रीन यासारखे अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच या मिनी इलेक्ट्रिक कार मध्ये लेडी लाईट, डिजिटल डिस्प्ले, टेललाईट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इम्पोर्टेन्मेंट सिस्टीम देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

रेंज आणि स्पीड किती? Electric Car

या इलेक्ट्रिक कार मध्ये २.५ KW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार १५० किलोमीटर पर्यंत रेंज देते. एवढेच नाही तर या मिनी इलेक्ट्रिक कारचे टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रति तास इतकं आहे. ही कार 12 सेकंदामध्ये शून्य ते 40 किलोमीटर प्रति तास इतका वेग वाढवण्यास सक्षम आहे. या गाडीमध्ये एकावेळी दोन किंवा जास्तीत जास्त तीन व्यक्ती प्रवास करू शकतात.

किंमत किती?

Yakuza च्या या इलेक्ट्रिक मिनी कारची किंमत 1.25 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यासोबतच या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 1.75 लाख रुपये आहे. तुम्ही ही कार  फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून खरेदी करू शकतात.