Electric Cars : टेस्ला नव्हे तर ‘ही’ कंपनी विकते सर्वाधिक कार

टाइम्स मराठी । वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Cars) पर्याय सर्वसामान्य जनतेला परवडणारा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे चांगली पसंती दिसत आहे . वाढती मागणी पाहता आता सर्वच ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवण्यामध्ये आपलं लक आजमावत आहे. एवढेच नाही तर या कंपन्या भारतीय मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वेगवेगळे फीचर्स, कनेक्टिव्हिटी, स्पेसिफिकेशन देण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची ही वाढती मागणी पाहता वाहन निर्माता कंपन्यांमध्ये प्रति स्पर्धा बघायला मिळत आहे. सर्वात जास्त कोणत्या कंपनीचे इलेक्ट्रिक वाहन विकला जात असेल असं तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही टाटा मोटर्स या कंपनीचे नाव घ्याल. परंतु अशा काही मोठ्या इलेक्ट्रिक वाहून बनवणाऱ्या कंपन्या आहेत ज्यांनी 2023 च्या पहिल्या सहा महिन्यात सर्वात जास्त इलेक्ट्रिक वाहन विकल्या आहेत.

   

इलेक्ट्रिक वाहन विक्रीचा डेटा नुकताच समोर आला आहे. या डेटानुसार टेस्ला नाही तर एका चिनी वाहन निर्माता कंपनीने सर्वात जास्त इलेक्ट्रिक वाहन विक्री केले आहे. जानेवारी 2023 ते जून 2023 या सहा महिन्यांमध्ये कोणत्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन विक्रीमध्ये आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे हे आणि कोणत्या इलेक्ट्रिक कारला जास्त डिमांड आहे हे आपण पाहणार आहोत.

1) BYD– Electric Cars

सहा महिन्यांमध्ये जास्त इलेक्ट्रिक वाहन विकणाऱ्या कंपनीमध्ये पहिल्या क्रमांकावर BYD ही कंपनी आहे. या कंपनीने सहा महिन्यात 11 लाख 91,405 कार विकल्या आहे. BYD ही चिनी कंपनी आहे. किंचूआन ऑटोमोबाईल कंपनी टेकओव्हर केल्यानंतर जानेवारी 2003 मध्ये ही BYD कंपनी स्थापन करण्यात आली होती. ही कंपनी कार, बस, ट्रक, इलेक्ट्रिक सायकल, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी चे उत्पादन सुरुवातीला करत होती. मार्च 2022 पर्यंत ही कंपनी पेट्रोल इंजिन वाहन तयार करत होती. सध्या बॅटरी इलेक्ट्रिक वाहने, प्लग इन हायब्रीड इलेक्ट्रिक वाहने ही कंपनी तयार करते. BYD कंपनीने 2022 मध्ये जानेवारी ते जून या 6 महिन्यात 641,000 इलेक्ट्रिक वाहने विकले होते. त्यावेळी टेस्लाला मागे टाकत ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी बनली होती. आणि आता देखील या कंपनीने टेस्टला मागे टाकत सर्वात जास्त इलेक्ट्रिक वाहन विक्री करणारी पहिली इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी बनली आहे.

2) टेस्ला

सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहन (Electric Cars) विक्री करणाऱ्या वाहन निर्माता कंपन्यांच्या लिस्टमध्ये दुसरा नंबर वर टेस्ला कंपनी आहे. टेस्ला मोटर्स ही अमेरिकन विद्युत ऊर्जेवर चालणारी गाडी बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचे सीईओ एलोन मस्क हे आहे. टेस्ला कंपनीने जानेवारी 2023 ते जून 2023 या 6 महिन्यांमध्ये 8 लाख 88 हजार 889 वाहन विक्री केली आहे.

3) BMW

सर्वाधिक वाहन विक्री (Electric Cars)करणाऱ्या वाहन निर्माता कंपनीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर बीएमडब्ल्यू आहे. ही एक जर्मन कार आणि बाईक बनवणारी कंपनी आहे. सध्या बीएमडब्ल्यू कंपनीच्या बीएमडब्ल्यू एक्स5, बीएमडब्ल्यू थ्री सिरीज, bबीएमडब्ल्यू एक्स थ्री, बीएमडब्ल्यू एक्स वन, बीएमडब्ल्यू पाच सिरीज, बीएमडब्ल्यू एक्स सात, बीएमडब्ल्यू 7 सिरीज, बीएमडब्ल्यू जेड4, बीएमडब्ल्यू M2 2023, बीएमडब्ल्यू सिरीज चार, बीएमडब्ल्यू i4, बीएमडब्ल्यू XM, बीएमडब्ल्यू i7 2023, बीएमडब्ल्यू सिरीज 8, बीएमडब्ल्यू सिरीज सहा, बीएमडब्ल्यू आय एक्स हे मॉडेल्स विकले जात आहेत. नुकतेच जाहीर झालेल्या यादीमध्ये बीएमडब्ल्यू या कंपनीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. जानेवारी 2023 ते जून 2023 या सहा महिन्यांमध्ये बीएमडब्ल्यू कंपनी ने 2 लाख 20 हजार 795 कार विकल्या.

4) GAC Aion

GAC Aion ही कंपनी या लिस्टमधील चौथ्या क्रमांकावर आहे. या कंपनीने दोन लाख 12 हजार 090 कारची विक्री केली आहे. हे ग्वांगझो ऑटोमोबाईल कॉर्पोरेशनचे इलेक्ट्रिक वाहन मार्क आहे.

5) Volkwagen –

पाचव्या क्रमांकावर Volkwagen ही कंपनी असून आतापर्यंत या कंपनीने 2,09,852 कार विक्री केली आहे. Volkswagen ही जर्मन ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना जर्मन सरकारने 1937 मध्ये केली होती. आता ही कंपनी सर्वात जास्त इलेक्ट्रिक कार विक्री करणाऱ्या लिस्ट मधील पाचव्या क्रमांकाची कंपनी बनली आहे.