भररस्त्यात Electric गाडीचे चार्जिंग संपलं तरी नो टेन्शन; ‘हे’ App करेल मदत

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) ग्राहकांचा प्रचंड कल वाढत आहे. आज काल महागाई प्रचंड वाढली असून पेट्रोल डिझेलचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. अशातच इलेक्ट्रिक वाहनांचा लुक डिझाईन मायलेज आणि विना पेट्रोल असल्यामुळे सर्वसामान्य जनता इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे आकर्षित होत आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या मनात इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर एक प्रश्न निर्माण आलेला आहे. तो प्रश्न म्हणजे चार्जिंगच्या (EV Charging) पायाभूत सुविधा. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल आणि रस्त्यात तुमच्या गाडीची बॅटरी संपली. अशावेळी तुम्हाला चार्जिंग स्टेशनची माहिती सहजरीत्या कशी मिळेल असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. अशा प्रकारचे प्रश्नांची उत्तरे आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

   

जर तुम्ही घरातून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करून बाहेर निघालात. परंतु प्रवास लांबल्यामुळे तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी संपली. आणि तुम्हाला जर चार्जिंग स्टेशन कुठे आहे हे माहीत नसेल तर तुम्हाला या अँप च्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन ची माहिती मिळू शकते. ते ॲप म्हणजे गुगल मॅप. गुगल मॅप च्या माध्यमातून तुम्हाला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी मदत होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला खालील प्रोसेस करावी लागेल.

1) गुगल मॅप उघडा.
2) तुम्हाला दाखवलेल्या सर्च ऑप्शन वर टॅप करा
3) त्यानंतर ईव्ही चार्जिंग स्टेशन नियर मी असं टाईप करा.
4) हे टाईप केल्यानंतर सहज करताच तुमच्यासमोर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची संपूर्ण लिस्ट ओपन होईल.

त्याचबरोबर तुम्हाला चार्जरची पॉवर आणि स्टेशनवर किती चार्जर आहेत याची देखील माहिती मिळेल. यासोबतच तुम्ही ज्या कंपनीचे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत आहात त्या कंपनीचे ॲप देखील तुम्ही मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर किंवा एप्पल ॲप स्टोअर वरून डाऊनलोड करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या फक्त वाहनांची नाही तर जवळपास असलेल्या चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी देखील मदत मिळते.