Electric की Petrol- Diesel? तुमच्यासाठी कोणती गाडी बेस्ट? पहा दोन्ही वाहनांमधील फरक

टाइम्स मराठी । कार बाजारात वाहनांचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, इलेक्ट्रिक (Electric) आणि नॉन-इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (Petrol- Diesel) हा गोंधळ जास्त दिसून येत आहे. मात्र तुम्हाला आम्ही हे सांगू इच्छितो की, या दोन्ही प्रकारच्या वाहनांमध्ये वेगवेगळे फरक आहेत. कारण या दोन्ही वाहन प्रकारांमध्ये स्वतःचे तोटे आणि फायदे आहेत. इलेक्ट्रिक आणि नॉन-इलेक्ट्रिक वेगवेगळ्या कारणांसाठी फायदेशीर आणि नुकसानदायी आहे. आज आपण याचविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

   

इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे

इलेक्ट्रिक वाहने त्यांच्या कमी किमतीसाठी ओळखली जातात. कारण ही वाहने पेट्रोल डिझेलपेक्षा जास्त स्वस्त असतात. इलेक्ट्रिक वाहने वापरणारी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या जास्त बचत करू शकते. त्याचबरोबर, इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. ज्यामुळे ही वाहने त्यांच्या वास्तविक किंमतीपेक्षा खूपच स्वस्त किमतीत मिळतात. यामुळे ग्राहक देखील जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वाहने खरेदी करण्याचा विचार करतात. मुख्य म्हणजे, पेट्रोल डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार कमी कर आकारतात. ज्यामुळे त्यांची देखभाल खर्च लक्षणीयरित्या कमी होतो. तसेच ICE वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांना कमी खर्च लागतो. सध्या बाजारात हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. ज्यामुळे चांगले पुनर्विक्री मूल्य मिळण्याची शक्यता देखील जास्त आहे. जे लोक आपली वाहने वारंवार बदलत राहतात त्यांच्यासाठी हा पर्याय पुरेसा आहे.

इलेक्ट्रिक वाहनाचे तोटे

इलेक्ट्रिक वाहनाची सुरुवातीची किंमत खूप जास्त असते. जी सामान्य लोकांसाठी परवडणे फार कठीण होऊन जाते. जे लोक बजेट कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांना ही रोख रक्कमेसह घेणे परवडत नाही. ईव्ही कार खरेदीसाठी सरकारकडून भरपूर प्रोत्साहन दिले जात असले तरी त्याची किंमत पेट्रोल डिझेलचा कारपेक्षा जास्त आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांमध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव दिसून येतो. त्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करताना ग्राहक संकोचतात.

नॉन इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे

पेट्रोल-डिझेल- किंवा सीएनजी वाहने इलेक्ट्रिक कार पेक्षा जास्त स्वस्त आणि परवडणारे असतात. ही वाहने खरेदी करणे देखील व्यवसायासाठी फायदेशीर असते. त्यामुळे अशी वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त विचार करावा लागत नाही. पेट्रोल-डिझेल सीएनजी वाहनांसाठी मजबूत पायाभूत सुविधा कंपनीकडून देण्यात येते. ज्यामुळे इंधन मिळविण्यात कोणतीही अडचण येत नाही. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चार्जिंगला जास्त वेळ लागतो. तसेच बाजारात नॉन-इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा पर्याय निवडणे सोपे होते.

इलेक्ट्रिक वाहनांचे तोटे

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे नॉन इलेक्ट्रिक वाहने परवडत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या वाहनांमुळे सर्वात जास्त प्रदूषण पसरले जाते. ICE वाहनांची देखभाल करणे इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा खूप महाग आहे. ही वाहने इंधनावर आधारित असल्यामुळे वायू प्रदूषण जास्त होते. या वाहनांमुळे भविष्यात मानवाला मोठी किंमत चुकवावी लागेल असे तज्ञांकडून देखील सांगण्यात आले आहे.