OLA ला टक्कर देणार ‘ही’ Electric Scooter ; 200 KM रेंज, किंमत किती?

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षापासून पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे ग्राहकांचा कल जास्त वाढत आहे. त्यामुळे बऱ्याच ऑटोमोबाईल कंपन्या आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक बनवण्यामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. अशातच आता इलेक्ट्रिक वेहिकल सेगमेंट मधील प्रसिद्ध कंपनी असलेल्या Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटर ला टक्कर देण्यासाठी Ambier N8 ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर मध्य प्रदेशातील Enigma Automobiles या कंपनीने तयार केली असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर तब्बल २०० किलोमीटर अंतर पार करू शकते. त्यामुळे ऑटोमोबाईल मार्केट मध्ये ही इलेक्ट्रिक स्कुटर धुमाकूळ घालेल यात शंकाच नाही. आज आपण Ambier N8 ची खास वैशिष्टये आणि तिच्या किमतीबद्दल जाणून घेऊया.

   

200 किलोमीटर पर्यंत रेंज-

Ambier N8 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 1500 W ची मोटर देण्यात आलेली असून लिथियम फेरो फोस्फेट बॅटरी देखील यामध्ये उपलब्ध आहे. या बॅटरीची कॅपॅसिटी 63V 60AH एवढी आहे. गाडीची बॅटरी फुल्ल चाह्र्ज करण्यासाठी ४ तासांचा वेळ लागेल. परंतु एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर Ambier N8 तब्बल २०० किलोमीटर अंतर पार करू शकते. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी सुद्धा ही गाडी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या इलेक्ट्रिक स्कूटरचे टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास आहे.

200 KG पर्यंत लोड क्षमता –

Ambier N8 ही इलेक्ट्रिक स्कूटर 220 kg वजनासह उपलब्ध असून यामध्ये 200 KG पर्यंत लोड वाहून नेण्याची क्षमता आहे. या स्कूटरला 26 लिटर बूट स्पेस दिलेला आहे. त्याचबरोबर 1290 mm चा विल बेस देखील यात आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ला रुंद असा फूट बोर्ड देण्यात आला असून ड्रायव्हरला पाय ठेवण्यासाठी मोकळी जागा मिळते. यासोबतच रुंद सीट तसेच पिलियन रायडर साठी बॅकरेस्ट देखील उपलब्ध आहे.

अन्य फीचर्स –

Ambier N8 या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 130 mm फ्रंट टेलिस्कोपिक फोर्स स्पेशल देण्यात आलेले असून यामध्ये स्प्रिंग सस्पेन्शन देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये कनेक्टिव्हिटी साठी सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, अँटी थेप्ट अलार्म, किलेस एन्ट्री, फाइंड माय स्कूटर, यूएसबी पोर्ट, मोटर वॉकिंग असिस्ट, रिव्हर्स मोड, जिओ फेसिंग, ब्लूटूथ यासारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्स मध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहे.

किंमत किती ?

Ambier N8 या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 1.05 लाख रुपयांपासून सुरू होऊन 1.10 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करण्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्री बुक करू शकतात. Ambier N8 इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही ग्रे, व्हाईट, ब्ल्यू, मॅट ब्लॅक, सिल्वर हे पाच कलर ऑप्शन्स मध्ये खरेदी करू शकता. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीवर कंपनीने तीन वर्षांची वॉरंटी दिलेली आहे.