Electric Scooter : Ather लवकरच लाँच करणार दमदार इलेक्ट्रिक स्कुटर; 115 KM रेंज, किंमत किती?

Electric Scooter । पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बरेच जण इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी पसंती देत आहेत. या इलेक्ट्रिक वाहनां मध्ये हाय ड्रायव्हिंग रेज असलेली स्कूटर जास्त डिमांडिंग आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ather Energy पुढील महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या इलेक्ट्रिकचे नाव कंपनी Ather 450S असं ठेवणार असून बाजारात ही इलेक्ट्रिक स्कुटर Ola S1 air ला थेट टक्कर देऊ शकते.

   

Ather 450S या स्कूटरच्या (Electric Scooter) टीजरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आलेले असून कंपनीने ड्रायव्हिंग रेंज आणि टॉप स्पीड बद्दल देखील खुलासा केला आहे. त्याचबरोबर या स्कूटरच्या टिजर वर ‘On the way’ लिहिलेलं आहे. कंपनीने मार्च 2023 मध्ये 450S चा ट्रेंडमार्कसाठी एप्लीकेशन दिले होते.आता कंपनीने या स्कूटरचा ट्रेडमार्क दाखल केला असून लवकरच लॉन्च होणार आहे. एकदा ही इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात लाँच झालयास ती Bajaj Chetak EV, TVS iQube आणि Ola S1 air या आघाडीच्या इलेक्टरइकं गाडयांशी सामना करेल.

115 KM रेंज – Electric Scooter

कंपनीच्या दाव्यानुसार, इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) Ather 450S ही एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर 115 किमी पर्यंत अंतर पार करेल तसेच यावेळी गाडीचे टॉप स्पीड ताशी 90 किलोमीटर असेल. कंपनीने या स्कूटरचा टिजर जारी केला असून या स्कूटर ची किंमत 1,29,999 रुपये एवढी असणार आहे. तसेच Ather 450S या स्कूटरची बुकिंग जुलै महिन्यामध्ये सुरू होण्याची अपेक्षा असून पुढच्या महिन्याच्या सुरुवातीलाच ही स्कूटर लॉन्च होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.