Electric Scooter : आजकाल इलेक्ट्रिक वाहन जास्त प्रमाणात खरेदी केली जात आहे. कारण इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा कोणताच ताण राहत नाही. यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांचा डॅशिंग लुक, मायलेज, किंमत, या सर्व गोष्टींमुळे इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येतो. आज -काल ग्राहकांना अशी स्कुटर हवी आहे, जी कोणत्याही जनरेशन मधील व्यक्ती वापरू शकतील. तुम्ही देखील असे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत Benling Falcon या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल. ही स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर असून अप्रतिम मायलेज देते. आज आपण जाणून घेऊया या स्कूटरचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.
किंमत
Benling Falcon या Electric Scooter ची एक्स शोरूम किंमत 69,540 रुपये एवढी आहे. परंतु तुम्ही ही स्कूटर 7000 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला तीन वर्षांपर्यंत 9.7% व्याजदरानुसार 2125 रुपये प्रति महिना EMI भरावा लागेल. त्याचबरोबर या डाऊन पेमेंट मध्ये बदल देखील होऊ शकतात. आणि या बदलानुसारच व्याजदरामध्ये बदल होऊन फक्त त्यामध्ये चेंज होऊ शकतो.
फिचर्स– Electric Scooter
Benling Falcon इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल व्हेरिएंट आणि सिंगल कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. हाय एंड स्कूटर असून सुद्धा ती दिसायला अतिशय आकर्षक आहे. या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये सिंगल सीट देण्यात आली आहे. या सीटवरून लांबच्या पल्ल्यासाठी सुद्धा तुम्ही अगदी आरामात राईड करू शकाल. या स्कूटरमध्ये अलॉय व्हील उपलब्ध करण्यात आले आहे. यात ट्यूबलेस टायर देण्यात आले असून दोन्ही टायर मध्ये डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहे. त्याचबरोबर या स्कूटरमध्ये स्मार्ट डिस्प्ले आणि स्पीडोमीटर उपलब्ध आहे.
बॅटरी
Benling Falcon या Electric Scooter मध्ये 1.8 KWH बॅटरी क्षमता देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये बॅटरी सोबतच BLDC मोटर देखील उपलब्ध करण्यात आली आहे ही स्कूटर पूर्ण चार्ज व्हायला ४ तासांचा कालावधी लागतो, परंतु एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर Benling Falcon इलेक्ट्रिक स्कुटर 70 किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करेल. यावेळी गाडीचे टॉप स्पीड हे 25 किलोमीटर प्रति तास इतकं असेल. ही इलेक्ट्रिक स्कुटर लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत कोणीही अगदी आरामात चालवू शकते.