300 KM रेंज देतेय ‘ही’ Electric Scooter; किंमतही आहे कमी

टाइम्स मराठी । वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता सर्वसामान्य नागरिकांची इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) घेण्याकडे कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल वाहनांची जागा इलेक्ट्रिक वाहन घेत आहेत. यासोबत सरकारकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट जागोजागी उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्माण करण्यामध्ये आपले नशीब आजमावत आहे. अशातच आता एक स्टार्टअप कंपनीने तब्बल 300 किलोमीटर पर्यंत रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.

   

किंमत किती?

IME Rapid असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. कमी चार्जिंग मध्ये जास्तीत जास्त रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये या गाडीचा समावेश होतो. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कुटर 99,000 ते 1.48 लाख रुपये किमतीमध्ये बाजारात आणली आहे. ही स्कूटर सर्वात आधी बेंगलोर मध्ये विक्रीसाठी उतरवण्यात आली आहे. त्यानंतर काही आठवड्यांमध्ये कर्नाटक यासोबतच इलेक्ट्रिक स्कूटर राज्यातील 20 – 25 शहरांमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटर च्या विक्रीसाठी फ्रेंचाईजी ऑन्ड कंपनी ऑपरेटेड FOCO याचा विचार करत आहे. तुम्ही देखील ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करून इंधन आणि तुमचे पैसे देखील बचत करू शकतात.

300 किमी पर्यंत रेंज-

IME Rapid या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 200 W ची मोटर देण्यात आली आहे. ही स्कुटर एकूण 3 रेंजमध्ये लाँच करण्यात आली आहे. यातील पहिल्या रेंजमध्ये 100 किमी, दुसऱ्या रेंजमध्ये 200 किमी आणि तिसऱ्या रेंजमध्ये 300 किमी पर्यंत ही इलेक्ट्रिक स्कुटर धावू शकते. त्यामुळे जरी तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर तुम्ही अगदी आरामात या स्कुटरवरून करू शकता.