Electric Scooter : 160 KM रेंज, 90 Kmph टॉप स्पीड; लाँच झाली दमदार इलेक्ट्रिक स्कुटर

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच वेगवेगळ्या कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी त्यांचे लक आजमावत आहे. आणि यामध्ये यशदेखील होताना दिसत आहेत. आता नुकताच ओकिनामा या इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपनीने Okhi90 चं अपडेटेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर दमदार मायलेज सह उपलब्ध असून भन्नाट फीचर्स यामध्ये दिलेले आहेत. Okhi90 या इलेक्ट्रिक स्कूटर ची एक्स शोरूम किंमत 1.86 लाख रुपये एवढी असून ही स्कूटर सप्टेंबर 2023 मध्ये मार्केटमध्ये उतरेल.

   

फीचर्स –

Okhi90 या इलेक्ट्रिक स्कूटर च्या (Electric Scooter) फिचर्समध्ये नवीन एनकोडर वर आधारित असलेली मोटर, डिजिटल स्पीडोमीटर, एंटी थेफ्ट अलार्म, जीपीएस नेवीगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोबाईल ॲप कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर ही स्कूटर लाल, निळा, ग्रे आणि पांढरा या कलर्स मध्ये उपलब्ध आहे.

160 किलोमीटर रेंज – (Electric Scooter)

Okhi90 या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये आता नवीन बॅटरी पॅक देण्यात आलेला असून हा AIS-156 अपडेट 3 च्या रूपात उपलब्ध आहे. ही बॅटरी 4-5 तासात फुल चार्ज होते. एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर Okhi90 इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 160 किलोमीटर पर्यंत धावू शकते. या स्कूटरचे टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास आहे. यामध्ये पुढच्या पिढीचा विचार करून मोटार आणि नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध करण्यात आली आहे.

ब्रेकिंग आणि सस्पेन्शन –

ब्रेकिंग आणि सस्पेन्शन साठी Okhi90 या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये (Electric Scooter) पुढच्या बाजूला हायड्रोलिक स्पेशल युनिट आणि मागच्या बाजूने डबल शॉकर सेटअप देण्यात येणार आहे. त्याचबरोबर रीजनरेटिव्ह एनर्जी सह ABS म्हणजेच इलेक्ट्रॉनिक असिस्टंट ब्रेकिंग सिस्टीम यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ऑटो कट फंक्शन आणि मायक्रो चार्जर देखील यामध्ये उपलब्ध आहे. ओकिनावा या कंपनीने सांगितले की, ते इटालियन पार्टनर टैसिटा सोबत मिळून त्यांचे प्रॉडक्ट पोर्टफोलिओ अपग्रेड करणार आहे. मे 2023 मध्ये ओकिनावा कंपनीने 2907 युनिट तर जून 2023 मध्ये ओकिनावा कंपनीने 2616 युनिट विकले होते. सरकारने सबसिडी बंद केल्यामुळे ही मोठी घसरण पहायला मिळाली होती.