Electric Scooter Under 50000 : फक्त 50 हजारांत खरेदी करा ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर

Electric Scooter Under 50000 । वाढत्या पेट्रोल डिझेलचे भाव पाहता इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड आजकाल चालू आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे परवडणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या घेण्याकडे प्रत्येकाचा कल दिसून येतो. त्याचबरोबर इलेक्ट्रिक गाड्या त्यांचा आकर्षक लूक, डिझाईन, फिचर्स आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध असल्यामुळे जास्त विकल्या जातात. जर तुम्ही देखील तुमच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहन घेऊ इच्छित असाल तर 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आपण आज पाहणार आहोत.

   
Evolet Pony Electric scooter

१) Evolet Pony Electric scooter-

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर पैकी एक असलेली ही ICAT प्रमाणित इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये वॉटरप्रूफ BLDC मोटर देण्यात आलेली असून ती 250 व्हॅटची पॉवर प्रदान करते. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 90 ते 120 किलोमीटर पर्यंत चालू शकते. या इलेक्ट्रिक स्कुटरचे टॉप स्पीड 25KM/h इतकं आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देण्यात आलेल्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये एक वर्षाची आणि मोटर वर 18 महिन्यांची वारंटी देण्यात आली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 41,124 रुपये ठेवली आहे.

Avon E Scoot

2) Avon E Scoot- (Electric Scooter Under 50000)

Avon E Scoot या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवाती किंमत 45000 रुपये असून ही सर्वात स्वस्त स्कूटर आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 48v 20ah बॅटरी पॅक उपलब्ध आहे. हि बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास लागतात परंतु एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 65 किलोमीटर पर्यंत रेंज देते. या इलेक्ट्रिक स्कूटरचे टॉप स्पीड सुद्धा फक्त 24 किलोमीटर प्रती तास आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करताना अडचण होऊ शकते.

Ujaas Energy eGo LA

3) Ujaas Energy eGo LA

या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 34 हजार 880 रुपये एवढी असून इतर इलेक्ट्रिक स्कुटरच्या मानाने ही किंमत खूपच कमी आहे. ही स्कूटर चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास लागतात. यामध्ये 60 V 26 Ah बॅटरी देण्यात आलेली असून 250 w ची मोटर देखील उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 75 किलोमीटर पर्यंत रेंज देते. त्याचबरोबर या स्कूटरचा टॉप स्पीड हा 25 ते 30 किलोमीटर प्रति तास आहे.