Electric Scooter Under 60000 : 60000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतेय ‘ही’ Electric Scooter

Electric Scooter Under 60000 : इलेक्ट्रिक वाहन खरेदी कडे आजकाल मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे.  पेट्रोल डिझेलचे वाढते भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन हा पर्याय सर्व सामान्य नागरिकांसमोर उपलब्ध आहे. काही इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती या परवडणाऱ्या नसल्यामुळे बरेच जण वाहन खरेदी टाळतात. परंतु भारतीय बाजारपेठेमध्ये अशा देखील इलेक्ट्रिक स्कूटरस उपलब्ध आहे ज्या कमी किमतीमध्ये असून अप्रतिम मायलेज देतात. त्यानुसार तुम्ही देखील परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत 60,000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत (Electric Scooter Under 60000) उपलब्ध असलेल्या स्कूटर बाबत. या स्कुटरचे नाव आहे Zelio Gracy i … आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

120 KM रेंज –

Zelio Gracy i या स्कूटरमध्ये दोन बॅटरी पॅक उपलब्ध आहेत. यातील 28 Ah 48V बॅटरी पॅक प्रकार हे एंट्री लेव्हल मॉडेल आहे. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 28Ah, 60V ही दुसरी बॅटरी सुद्धा मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर ६ ते ८ तासांमध्ये फुल चार्ज होते. आणि सिंगल चार्जवर ही स्कूटर तब्बल 120 किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करते.

ब्रेकिंग सिस्टीम

Zelio Gracy i ही स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये स्टायलिश लाईट सह शार्क लॉज उपलब्ध करण्यात आले असून या स्कूटरमध्ये सुरक्षेला जास्त महत्व दिले आहे. त्यानुसार यामध्ये फ्रंट आणि रियल मध्ये डिस्क ब्रेक वापरण्यात आला आहे.  यामुळे अचानक ब्रेक लावताना रायडर व्यवस्थित स्कूटर कंट्रोल करू शकतो. आणि यामुळे टायर्स स्लिप होत नाही.

फिचर्स

Zelio Gracy i या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये सिंगल सीट उपलब्ध आहे.  ज्यामुळे लॉंग रूट वर आरामदायी प्रवास होऊ शकतो. या स्कूटरमध्ये लॉंग हँडल बार देण्यात आले आहे. त्यामुळे स्कुटर ला अप्रतिम लूक क मिळतोय. Zelio Gracy i मध्ये हेवी सस्पेन्शन देण्यात आले आहे. या स्कूटर मध्ये देण्यात आलेले टायर मोठ्या साईज मध्ये उपलब्ध आहे. तसेच यामध्ये ट्यूबलेस टायर स्पीडोमीटर डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे.

किंमत किती – Electric Scooter Under 60000

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Zelio Gracy i या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 56,825 एवढी आहे. त्याचबरोबर 60V बॅटरी पॅक असलेल्या स्कूटर ची किंमत  59,755 रुपये एवढी आहे. ही या कंपनीची न्यू जनरेशन हाय एंड स्कूटर आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 60,000 रुपयांपेक्षाही कमी (Electric Scooter Under 60000) असल्याने नक्कीच सर्वसामान्य माणसाला ती परवडणारी आहे यात शंकाच नाही.