Electric Tractor X45H2 : ‘या’ कंपनीने आणलाय Electric Tractor; फुल्ल चार्जवर 8 एकर शेतीचे काम करणार

Electric Tractor X45H2। आज- काल वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीमुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामध्ये ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये स्कूटर, बाईक्स, कार्स यासोबत शेतीसाठी उपयुक्त असे ट्रॅक्टर देखील इलेक्ट्रिक पद्धतीने कंपन्यांनी तयार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात मदत होत असते. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. पर्यावरणाचा विचार करून आणि किमतींचा विचार करून इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा अत्यंत चांगला पर्याय आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर ऑटो नेक्स्ट ऑटोमेशन या कंपनीने X45H2 हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. हा ट्रॅक्टर पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला असून या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या वापराने ध्वनी प्रदूषणही कमी होते. त्याचबरोबर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला इंधनच लागत नसल्याने शेतीचा खर्च 80% पर्यंत देखील कमी होऊ शकतो.

   

काय आहेत फीचर्स – Electric Tractor X45H2

X45H2 या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये (Electric Tractor X45H2) पावर स्टेरिंग देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेल्या बॅटरी मधूनच वीज मिळू शकते. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये 35KWHr बॅटरी देण्यात आलेली असून ही बॅटरी 3000 तास किंवा 8-10 वर्षे टिकते. यासोबतच या ट्रॅक्टरमध्ये 32 KW ची मोटर देखील देण्यात आली आहे. X45H2 या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये 2 चार्जिंग पर्याय देण्यात आलेले असून हा ट्रॅक्टर 8 तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. त्याचबरोबर फास्ट चार्जर ने हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर फक्त 2 तासांमध्ये चार्ज होऊ शकते. पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर हा ट्रॅक्टर शेतात 8 तास काम करू शकतो. या 8 तासांमध्ये 8 एकर जमिनीचे काम करण्यास हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सक्षम आहे. या ट्रॅक्टरची क्षमता बघितली तर जवळपास 1800 किलोपर्यंत शेतीचे अवजारे आरामात उचलू शकतो.

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवण्यामध्ये सोनालिका आणि महिंद्रा या कंपनीने देखील लक आजमावले आहे. सोनालिका टायगर हा एक ११ HP ट्रॅक्टर असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करू शकते. या ट्रॅक्टर मध्ये 25.5 kw क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. ही बॅटरी दहा तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. त्याचबरोबर फास्ट चार्जर ने चार तासांमध्ये चार्जिंग पूर्ण होऊ शकते. यासोबतच सोनालिकाचा हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर एकदा चार झाल्यावर आठ तास काम करू शकतो. या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचा 75% खर्च कमी होऊ शकतो. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत 6.40 ते 6.72 लाख एवढी आहे.