देशातील पहिला Electric Truck; लुक पाहून तुमचाही होश उडेल

टाइम्स मराठी । देशात इलेक्ट्रिक वाहनांची चांगलीच चलती आहे. आत्तापर्यंत आपण इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक कार, फ्लायिंग इलेक्ट्रिक कार, त्याचबरोबर ई रिक्षा, ई ऑटो बघितली असेल. परंतु आता देशात इलेक्ट्रिक ट्र्कही लाँच झाला आहे. ट्रेसा मोटर्स या कंपनीने आपला पहिला इलेक्ट्रिक ट्रक VO.1 बाजारात आणला आहे. या इलेक्ट्रिक ट्रस्टचा लूक आणि डिझाईन बघून तुम्ही सुद्धा शॉक व्हाल.

   

या इलेक्ट्रिक ट्रकला त्याच्या फ्लॅगशिप Axial Flux Motor Platform Flux 350 यावर तयार करण्यात आले आहे. इंडस्ट्रियल डिझाईन, एक्सएल प्लस पॉवरट्रेन, सुरक्षित बॅटरी पॅक यावर कंपनीने जास्त भर दिला आहे. भारतात सध्या 2.8 मिलियन ट्रक्स आहेत ज्यांचं कार्बन उत्सर्जनात 60 टक्के योगदान असून आज-काल शून्य उत्सर्जन वाल्या रेडियम आणि हेवी ट्रकांची जास्त आवश्यकता आहे.

ट्रेसा मोटर्स भारतातील जास्तीत जास्त ट्रक इलेक्ट्रिक ट्रक्समध्ये रूपांतरित करण्याच्या प्रयत्नात आहे. ते पारंपारिक डिझेल ट्रकला कमीत कमी किमतीत सुरक्षित, नाविन्यपूर्ण आणि पर्यावरण पूरक पर्याय उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर 2024 मध्ये येणाऱ्या वाहन स्क्रॅपेज पॉलिसी आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे मिडीयम आणि हेवी इलेक्ट्रिक ट्रक वापरण्याची हीच योग्य वेळ आहे.

एक्सएल फ्लक्स मोटर टेक्नॉलॉजी म्हणजेच फ्लक्स 350 ही 350 किलोव्हॅट एवढी पॉवर पुरवते. हे एकमेव भारतीय OEM आहे, जे अशा प्रकारचे पॉवर आउटपुट देते. हे या ट्रेसा मोटर्स चे खास फिचर आहे. त्याचबरोबर एक्सएल फ्लक्स मोटर हे छोटा आकारात असून कमी वजनासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ही भारतात विकसित झालेली टेक्नॉलॉजी आहे.

ट्रेसा मोटर चे फाउंडर CEO रोहन श्रवण यांनी सांगितलं की, आम्ही बऱ्याच आव्हानांना सामोरे जात ट्रेसा इलेक्ट्रिक ट्रक बनवण्यात यशस्वी झालेलो आहोत. ट्रेसा च्या टीमने भारत, जर्मनी, युएस, जपान या ठिकाणी 200 पेक्षा जास्त ट्रक बनवले आणि विक्री केले आहेत. त्याचबरोबर पर्यावरणीय फायदे, कार्यक्षमता, अतुलनीय शक्ती हे इलेक्ट्रिक ट्र्क देतात.