पावसाळ्यात ‘अशी’ घ्या इलेक्ट्रिक गाड्यांची काळजी; अन्यथा होईल मोठं नुकसान

टाईम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांना आता जास्त पसंती मिळत आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता ग्राहक आता इलेक्ट्रिक बाइक, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर या वाहनांना पसंद करत आहेत. यातच आता पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्याच्या या दिवसात इलेक्ट्रिक गाड्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी नेमक्या काय उपाययोजना आणि खबरदारी घ्यावी लागेल याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

   

१) इलेक्ट्रिक वाहन पाण्यापासून वाचवा –

पावसाळ्यामध्ये वाहनांची काळजी घेण्यासाठी पाण्यापासून इलेक्ट्रिक वाहन लांब ठेवणे गरजेचे आहे. काही कंपन्यांनी वॉटरप्रूफ सुरक्षा सोबत कार बाजारात लॉन्च केले आहेत. तरीसुद्धा तुम्हाला तुमची गाडी पाण्यापासून वाचवणं गरजेचं आहे.

२) ओलावा टाळा

इलेक्ट्रिक कार मध्ये ओलावा असल्यास याचा खूप मोठा परिणाम कार वर पाडतो. त्यामुळे इलेक्ट्रिक कारला ओलाव्यापासून वाचवणे गरजेचे आहे.

३) धुळी पासून संरक्षण करा-

इलेक्ट्रिक कारची किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रिक गाडीची साफसफाई करणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याचदा वाहनाच्या पार्टमध्ये साचलेली धूळ आणि जंतूंचा गाडीवर परिणाम होतो. त्यामुळे इलेक्ट्रिक कार किंवा वाहनाचा धुळी पासून बचाव करणे गरजेचे आहे.

४) सतत बॅटरी आणि अन्य पार्ट चेक करत राहा

इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी सतत चेक करणे गरजेचे आहे. त्यामध्ये काही लिकेज इन्सुलेशन किंवा कनेक्टर यामध्ये बऱ्याचदा उंदीर घुसण्याची शक्यता असते. त्यामुळे ते चेक करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पाण्यामुळे सुद्धा बॅटरीवर परिणाम होऊ शकतो .

५) जास्त पाण्यात गाडी चालवू नका –

पावसाळ्यात सर्वत्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असत, परंतु अशावेळी इलेक्ट्रिक गाडी पाण्यात चालवू नका. इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये सेन्सिटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सर असल्यामुळे ते पाण्यामुळे खराब होऊ शकतात.

६) जास्त चार्ज करू नका

इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग सॉकेट बऱ्याचदा ग्राहकांच्या पार्किंग मध्ये असते. त्यामुळे अनेकजण चार्जिंग लवकर व्हावं आणि लवकर संपू नये यासाठी जास्त वेळ इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी चार्जिंगला लावून ठेवतात. परंतु यामुळे तुमच्या वाहनाचे आणि बॅटरीचे देखील नुकसान होऊ शकते. तुम्हाला वाहन चार्जिंग करायचे असेल तर तुम्ही 30 ते 80 टक्के चार्जिंग करून जास्त मायलेज मिळवू शकता.