बल्ले बल्ले!! आता वीजबिल येणार कमी; सरकारने उचललं मोठं पाऊल

टाइम्स मराठी । आजकाल महागाईला सर्वजण त्रस्त झालेले आहे. त्याचबरोबर प्रत्येकाच्या महिन्याचं बजेट या महागाईमुळे कोलमडल्याचा चित्र दिसतं. त्यातच महत्वाचा मुद्दा म्हणजे विज बिल. भरमसाठ वीज बिलामुळे बऱ्याच जणांना त्यांची सेविंग देखील मोडावी लागते. यासर्वावर उपाय काढण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. केंद्र सरकार लवकरच ‘टाईम ऑफ डे’ (टीओडी) नियम लागू करणार आहे. त्यानुसार देशभरातील वीज ग्राहक दिवसा वीज वापराचे व्यवस्थापन करू शकतील. आणि त्यांच्या वीज बिलात २०% पर्यंत बचत होईल.

   

सकाळच्या सत्रात 6 ते 9 या वेळेत लोकांना कामाला जाण्याची लगबग सुरू असते, आणि सायंकाळच्या सत्रात 6 ते 9 या वेळेत लोक घरी येतात. म्हणजेच या टाइम मध्ये जास्त वीज जळते. सायंकाळी घरी आल्यावर सर्वजण रिलॅक्सेशन म्हणून टीव्ही लावतात. सायंकाळी लाईट, फॅन, पंखे हे देखील सुरू करावेच लागतात. यानुसार सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 6 ते 9 हा पिक आवर टाईम असणार आहे. या पिक आवर मध्ये विजेची मागणी वाढते, त्यामुळे ग्रीडवर जास्त ताण पडतो.

ऊर्जा मंत्रालयाकडून लावण्यात येणाऱ्या नियमानुसार, दिवसभरात एकाच दराने विजेसाठी शुल्क आकारण्याऐवजी, वापरकर्त्याने विजेसाठी भरलेली किंमत दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी बदलेल. जर तुम्ही पीक आवर मध्ये ऊर्जा रिलेटेड काम करत असाल तर तुमचे बिल 20 टक्क्यांनी वाढेल. त्याचबरोबर पिक आवर संपल्यानंतर जर तुम्ही वीज वापरली तर तुमच्या वीज बिलामध्ये 20 टक्क्यांची बचत होऊ शकेल. या नियमाप्रमाणे ग्राहक विजेच्या वापराचे व्यवस्थापन करून पैसे वाचवू शकतील. त्याचबरोबर यामुळे वीजबिलात 20% सूट मिळू शकेल.

ऊर्जा मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, देशाने विद्युत नियम 2020 मध्ये सुधारणा करून सध्याच्या वीज शुल्क प्रणालीमध्ये दोन बदल केले आहेत. त्यामध्ये टीओडी नुसार शुल्क प्रणालीची सुरुवात आणि स्मार्ट मिटर या संबंधित तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी 1 एप्रिल 2024 पासून 10 kw आणि त्यापेक्षा जास्त मागणी असलेल्यांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर 1 एप्रिल 2025 पासून शेती सोडून इतर सर्व वीज बिल धारकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. याशिवाय स्मार्ट मिटर धारकांना मिटर बसवल्या नंतर या योजनेचा लाभ होणार आहे.