Mobile, TV सह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू होणार स्वस्त; सरकारने GST केला कमी

टाइम्स मराठी । वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे. सरकारने Mobile, TV सह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील GST कमी केला आहे. त्यामुळे इथून पुढे मोबाईल, LED बल्ब , टीव्ही, फ्रीज आणि अनेक इलेक्ट्रॉनिक आयटम स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. वित्त मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल ट्विटर वरून माहिती देत सर्व उत्पादनाचा रेट चार्ट पोस्ट केला आहे. त्यामध्ये मोबाईल, स्मार्ट टीव्ही, LED बल्ब, फ्रिज, UPS, वॉशिंग मशीन या सर्व वस्तूंवर लावण्यात आलेला GST हा 31.3 टक्के कमी करून 12 टक्के करण्यात आला आहे.

   

एंटरटेनमेंट म्हणून आपण टीव्ही बघत असतो. त्यावर येणारे प्रोग्राम, सीरिअल, बातम्या या सर्वांचा आढावा आपण घेत असतो. म्हणजेच ती सुद्धा जीवनावश्यक वस्तू आहे. या टीव्ही खरेदी वेळी लावण्यात येणारा टॅक्स देखील आता सरकारने कमी केला असून आता आपल्याला कमी किंमतीत नवीन टीव्ही विकत घेता येऊ शकतो. त्याचबरोबर आता सरकारने 27 इंच किंवा त्या पेक्षा कमी साईज असलेला टीव्ही घेतल्यास,31.3 टक्के GST कमी करून 18 टक्के केला आहे. परंतु जर तुम्ही 27 पेक्षा जास्त इंच चा टीव्ही घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार नाही. 27 इंच पेक्षा जास्त किंवा 37 इंच टीव्ही वर GST हा 31.3 टक्केच असणार आहे.

मोबाईल फोन हा आपल्या रोजच्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. सरकारने आता या मोबाईल फोन वर लावण्यात येणारा GST कमी केला आहे. जर तुम्ही मोबाईल फोन खरेदी करत असाल तर त्यावर लागणारा GST 31.3 टक्क्यावरून 12 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईल खरेदी करताना तुमचे जास्त पैसे खर्च होणार नाहीत.

त्याचबरोबर सरकारने होम अप्लायन्सेस वर लावण्यात आलेला GST पण कमी केला आहे. यामध्ये फ्रिज, वाशिंग मशीन, पंखा, कुलर, गिजर, यावर लावण्यात येणारा GST 31.3 टक्क्यावरून 18 टक्के केला आहे. एवढंच नाही तर बाकीच्या वस्तू जसे की, मिक्सर, ज्यूसर, वैक्युम क्लीनर यावर लावण्यात येणारा GST 31.3 टक्क्यावरून 18 टक्के केला आहे. यासोबतच LED वर लावण्यात येणारा GST 15 टक्के होता तो कमी करून 12 टक्के करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्य माणसाला काही प्रमाणात महागाईपासून दिलासा मिळाला आहे.