Elista कंपनीचा हा 75 इंची SmartTV ठरेल तुमच्यासाठी बेस्ट; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । Elista कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन अल्ट्रा प्रीमियम QLED 4K स्मार्टटीव्ही लॉन्च केला आहे. Elista कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च करत असते. आता कंपनीने लॉन्च केलेला हा टीव्ही WebOS TV वर काम करतो. हा Smart TV भिंतीवर किंवा कॅबिनेटवर देखील ठेवला जाऊ शकतो. कंपनीने या टीव्ही सोबत टीव्ही स्टॅन्ड देखील उपलब्ध केला आहे. तुम्ही देखील हा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्व इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हा उपलब्ध करण्यात आला आहे.

   

स्पेसिफिकेशन

Elista 75 inch QLED 4K smart TV या स्मार्ट टीव्ही मध्ये 75 इंच चा QLED 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 3840 × 2160 पिक्सेल रिझोल्युशन प्रदान करतो. ही स्मार्ट टीव्ही WebOS वर काम करत असून यामध्ये ThinQ AI सपोर्ट देखील उपलब्ध करण्यात आला आहे. ThinQ AI हे व्हॉइस कमांड साठी सुसज्ज करण्यात आले आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Elista 75 inch QLED 4K smart TV या स्मार्ट टीव्ही मध्ये 20W स्पीकर देण्यात आला आहे. हा स्पीकर डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटी साठी या स्मार्ट टीव्ही मध्ये ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0, यूएसबी, एव्ही इन, ऑप्टिकल आउट, एचडीएमआय, इयरफोन आउट यासारखे फीचर्स दिले आहेत.

फीचर्स

Elista 75 inch QLED 4K smart TV या स्मार्ट टीव्ही मध्ये नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ यासारख्या ओडिटी ॲप्सचे एक्सेस देखील उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचबरोबर या ॲप साठी डेडिकेशन बटन टीव्ही रिमोट मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यासारखे बरेच फिचर्स या स्मार्ट टीव्ही मध्ये उपलब्ध आहेत.

किंमत किती?

Elista 75 inch QLED 4K smart TV हा स्मार्ट टीव्ही 2 लाख 990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. परंतु कंपनीने या स्मार्ट टीव्हीवर लॉन्चिंग ऑफर उपलब्ध केली आहे. त्यानुसार हा स्मार्ट टीव्ही 1,59,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. तुम्ही हा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स वर देखील हा स्मार्ट टीव्ही आज पासून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.