Elista कंपनीने लॉन्च केला नवा Smart TV; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी | आज-काल Smart TV ची मोठ्या प्रमाणात चलती दिसून येते. आता स्मार्ट टीव्ही निर्माता कंपनी ELISTA ने google पावर्ड TV लाईनअप ची घोषणा केली आहे. या लाईनअप मध्ये पाच स्क्रीन साईज असलेल्या स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. त्यानुसार कंपनीने 32 इंच, 43 इंच, 50 इंच, 55 इंच आणि 65 इंच स्क्रीन साईज असलेल्या स्मार्ट टीव्ही लॉन्च केल्या आहेत. या स्मार्ट टीव्ही ची सुरुवाती किंमत 16,999 ते 62,990 रुपये एवढी आहे. आज आपण जाणून घेऊया या स्मार्ट टीव्ही मध्ये उपलब्ध असलेले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

फीचर्स –

ELISTA गुगल पावर्ड टीव्ही मध्ये अप्रतिम पिक्चर आणि साऊंड कॉलिटी देण्यात आली आहे. हा स्मार्ट टीव्ही google tv OS वर चालते. यामध्ये HDR 10 आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्ट उपलब्ध आहे.  GTV स्मार्ट टीव्ही लाइन अप मध्ये google व्हॉइस कमांड देखील देण्यात आली आहे. या कमानुसार तुम्ही व्हॉइस च्या मदतीने tv कंट्रोल करू शकतात. यासोबतच स्मार्ट टीव्ही मध्ये गेमिंग कन्सोल, म्युझिक सिस्टीम, साऊंड बार यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन-

ELISTA GTV 65 UILED या स्मार्ट टीव्ही मध्ये  65 इंच स्क्रीन साइज  मिळते. जेणेकरून थेटर प्रमाणे अनुभव घेऊ शकतात. या स्मार्ट टीव्ही मध्ये चाइल्ड मोड देखील उपलब्ध आहे. जेणेकरून मुलांना सुरक्षित आणि मनोरंजक अनुभव मिळेल. कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये ब्लूटूथ 5.1, ड्युअल बँड वायफाय, ॲपल टीव्ही सपोर्ट, बिल्ट इन गुगल क्रोम कास्ट सपोर्ट मिळतो.

किंमत किती?

ELISTA XPlore Series या स्मार्ट टीव्ही मध्ये ग्राहकांना वॉल माउंटेड आणि स्टॅन्ड हे दोन ऑप्शन मिळतील. स्टॅन्ड या ऑप्शन नुसार तुम्ही स्मार्ट टीव्ही स्टैंड वर लावू शकतात. आणि वॉल माऊंटेड ऑप्शन नुसार तुम्ही स्मार्ट टीव्ही भिंतीवर लावू शकतात. या स्मार्ट टीव्ही च्या किमतींबद्दल बोलायचं झालं तर, 32 इंच  HILD टीव्ही ची किंमत 16,999 रुपये आहे. 43 इंच  FILED टीव्ही ची किंमत 27,500 रुपये एवढी आहे. 43 इंच  UILD टीव्ही ची किंमत 31500,  50 इंच  UILED टीव्ही ची किंमत 39,990, 55 इंच  UILED स्मार्ट टीव्ही ची किंमत 42,990 रुपये आणि 65  इंच UILED टीव्ही ची किंमत 62,990 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.