Elon Musk ट्विटरवर कम्युनिटी अॅडमिन्सना देत आहे नवीन फीचर

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या ट्विटर मध्ये एलन मस्क यांनी बरेच बदल केले होते.  त्यानुसार याच वर्षी  ट्विटरने पेड सबस्क्रिप्शन सर्विस देखील सुरू केली होती. ही सर्विस भारतासोबतच बाकी देशांसाठी देखील उपलब्ध करण्यात आली होती.  आता ट्विटरवर एलन मस्क कम्युनिटी एडमिन्सला फेसबुक ग्रुप प्रमाणे फीचर्स उपलब्ध करून देत आहेत. हे फीचर्स अप्रतिम असून  युजर्सला ग्रुप मध्ये ऍड होण्यासाठी चान्स मिळू शकेल.

   

काय आहे हे फीचर

एलन मस्क  ट्विटर मध्ये उपलब्ध करणार असलेल्या फीचर्स मध्ये सोप्या पद्धतीने एन्ट्री मिळणार नसून ग्रुप जॉईन करण्यापूर्वी युजर्स ला एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. त्यानंतर एडमिन त्या व्यक्तीला ग्रुप मध्ये एंट्री द्यावी की नाही यावर निर्णय घेईन. फेसबुक वर उपलब्ध असलेल्या या फीचरमध्ये देखील अशाच पद्धतीने युजर्स ला ऍड केले जाते.  फेसबुक वर या कम्युनिटी ग्रुप मध्ये ऍड होण्यासाठी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते. या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर एडमिन त्या युजर्स ला ग्रुप मध्ये एंट्री देऊ शकतो. एन्ट्री द्यावी की नाही हे पूर्णपणे एडमिनच्या हातात आहे.

प्रश्नाचे उत्तर देऊन ग्रुप जॉईन करता येईल

ज्याप्रकारे फेसबुक वर कम्युनिटी ग्रुप मध्ये  प्रोसेस करावी लागते त्याच प्रकारे ट्विटरवर देखील करावी लागणार आहे. म्हणजेच युजर्सला ट्विटर वर देखील प्रायव्हेट कम्युनिटी जॉईन करण्यापूर्वी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. एवढेच नाही तर ग्रुपच्या नियमानुसार युजर्सला वागावे लागेल. त्यानंतर अप्रूवल वर युजर्स कम्युनिटी मध्ये जॉईन होऊ शकतील. हे कम्युनिटी फीचर्स ट्विटर प्रीमियम युजर्स ला 900 रुपयांच्या किमतीमध्ये मिळेल. याबाबत ट्विटरवर  एक स्क्रीन शॉट देखील शेअर करण्यात आला आहे. 

पेड युजर साठी फीचर्स उपलब्ध

फेसबुक वर उपलब्ध असलेले हे क्वेश्चन फीचर अप्रतिम असून ग्रुप ॲडमिन हवं असेल तर मल्टिपल क्वेश्चन युझर्स ला जॉईन करताना विचारू शकतात. परंतु ट्विटरवर यापेक्षाही वेगळे आहे. त्यानुसार फेसबुकवर ज्या प्रकारे कोणताही व्यक्ती ग्रुप बनवू शकतो त्याप्रमाणे ट्विटरवर  कोणताही व्यक्ती ग्रुप बनवू शकत नाही. हे फीचर्स फक्त पेड युजर्स साठी  आणि पेड युजर्स कम्युनिटी बनवण्यासाठी डेव्हलप करण्यात आले आहे. परंतु यामध्ये कोणीही जॉईन होऊ शकतात.