Elon Musk यांनी ट्विटरवर लाँच केलं AI टूल; काय खास मिळणार?

टाइम्स मराठी । काही दिवसांपूर्वी Elon Musk यांनी X म्हणजेच ट्विटरवर 2 सबस्क्रीप्शन प्लॅन्स लॉन्च केले होते. त्यानंतर आता ट्विटर ने पहिले AI चॅट टूल  लॉन्च केले आहे. हे ट्विट चे पहिले AI टूल असून त्याचे नाव GROK असल्याचं एलन मस्क यांनी सांगितलं. या AI टूलचे एक्सेस सध्या यूजर्सना नाही तर फक्त प्रीमियम प्लस युजर साठी उपलब्ध करण्यात आले आहे. याबाबत ट्विटर वर  एलन मस्क यांनी माहिती शेअर केली.

   

एलन मस्क यांनी म्हंटल, GROK हे टूल्स सध्या बीटा टेस्टिंग सह प्रीमियम सबस्क्राईबर्स साठी उपलब्ध आहे. एलन मस्क ट्विटर मध्ये वेगवेगळे बदल करत असून यात वेगवेगळे फीचर्स देखील ऍड करण्यात येत आहे. जेणेकरून युजर्स ला ट्विटर वापरणे मजेशीर ठरेल. यापूर्वी कंपनीने युजर साठी प्रीमियम प्लस सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च केला होता. या सबस्क्रीप्शन प्लॅन ची किंमत 16 डॉलर प्रति महिना एवढी ठेवण्यात आली होती. या सबस्क्रीप्शन प्लॅनच्या माध्यमातून युजर्स ला ऍड फ्री एक्सपिरीयन्स मिळेल असं सांगण्यात आलं होतं.

जाणून घ्या GROK बद्दल

आता ट्विटर ने लॉन्च केलेले नवीन चॅटटूल GROK हे Google Bard आणि Chat GPT प्रमाणेच एक AI टूल आहे. हे ट्विटर चे पहिले AI टूल असून हे रियल टाईम मध्ये एक्सेस करता येऊ शकते. हे टूल युजर्सने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकते. एवढेच नाही तर GROK या AI टूल ला व्यंगचित्र देखील आवडते.

टूल बद्दल काय म्हणाले एलन मस्क

या GROK AI टूलबाबत एलन मस्क यांनी सांगितलं की, या टूलला गाईड कोण करत आहे हे त्याला माहित नाही. GROK ची स्वतःची एक समज आहे. हे टूल युजरच्या प्रश्नांची उत्तरे अचूक देऊ शकतो.  त्याचबरोबर काही प्रश्नांची उत्तर GROK देत नाही. समजा तुम्ही  GROK ला ड्रग्स बद्दल माहिती विचारली तर  याबाबत GROK उत्तर देण्यास नकार देते.