Twitter यूजर्सना मोठा धक्का!! Elon Musk ने आणले 2 नवे प्लॅन; किंमत वाचून झोप उडेल

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगर म्हणजेच Twitter वर Elon Musk यांनी बरेच बदल केले आहेत. त्यानुसार आता एलन मस्क कडून वेगवेगळे फीचर्स ट्विटर मध्ये उपलब्ध करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी ट्विटर युजर साठी नवीन सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता त्यांनी युजर साठी दोन नवीन सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च केले आहे. याबाबत स्वतः एलन मस्क यांनी पोस्ट करत माहिती दिली. एलन मस्क यांनी लॉंच केलेल्या दोन सबस्क्रीप्शन प्लॅन पैकी पहिला प्लॅन म्हणजे प्रीमियम प्लस प्लॅन. प्रीमियम प्लस सबस्क्रीप्शन प्लॅनमध्ये जाहिराती शिवाय ट्विटर वापरता येईल. आणि दुसरा एन्ट्री लेवल बेसिक प्लॅन आहे. हे दोन्ही नवीन प्लॅन असून या एंट्री लेवल बेसिक प्लॅन मध्ये ट्विटर वापरताना ऍड दिसतील. या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये बरेच बेसिक फीचर्स देण्यात आले आहे.

   

जाणून घ्या प्लॅन ची किंमत

नवीन एन्ट्री लेवल बेसिक प्लान ची किंमत तीन डॉलर म्हणजेच 250 रुपये महिना एवढी आहे. या एंट्री लेवल बेसिक प्लॅन मध्ये तुम्हाला दिसतील. त्यानुसार या प्लॅनमध्ये पोस्ट एडिटिंग, पोस्ट अंडू, SMS आणि कस्टमायझेशन फीचर्स यांचा समावेश होतो. या बेसिक प्लॅनमध्ये क्रियेटर फिचर्स आणि चेकमार्क देण्यात आलेले नाहीत. हा प्लॅन वेब साठी उपलब्ध आहे.  त्याचबरोबर प्रीमियम प्लस प्लॅन ची किंमत 16 डॉलर म्हणजेच 1300 रुपये प्रति महिना एवढी आहे.  प्लॅन वेब साठी उपलब्ध आहे. यासोबतच प्रीमियम प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्रीमियम प्लॅनची किंमत 650 रुपये प्रति महिना एवढी असून यामध्ये प्रीमियम आणि क्रियेटर फीचर्स देण्यात आले आहे. परंतु या प्रीमियम प्लॅनमध्ये जास्त ऍड उपलब्ध आहेत.

बेसिक प्लॅन

बेसिक प्लॅनमध्ये व्हेरिफिकेशन आणि सिक्युरिटीसाठी SMS 2 फॅक्टर ऑथेंटीकेशन, इन्क्रिप्टेड डायरेक्ट मेसेज मिळतात. त्याचबरोबर ऍडव्हान्स एक्सपिरीयन्स साठी, एडिट पोस्ट लॉंग पोस्ट अंडू पोस्ट, लॉन्ग व्हिडिओ पोस्टिंग, टॉप आर्टिकल्स, रीडर, बॅकग्राऊंड व्हिडिओ प्ले बॅक, डाउनलोड व्हिडिओ, स्मॉल रिप्लाय बूस्ट, फॉर यू आणि फॉलोइंग मध्ये ऍड प्रमाणे फीचर्स मिळतात. या प्लॅनमध्ये क्रियेटर साठी कोणते फीचर्स उपलब्ध नाही. त्याचबरोबर लार्जेस्ट रिप्लाय बूस्ट देखील उपलब्ध नाही. या बेसिक प्लॅनमध्ये कस्टमायझेशनसाठी ॲप आयकॉन बुकमार्क, फोल्डर्स कस्टमयझेशन, नेवीगेशन थीम, हायलाईट ॲप, लाईक आणि सबस्क्रीप्शन हाईड यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.   

प्रीमियम प्लॅन

ट्विटर वर उपलब्ध असलेल्या प्रीमियम प्लॅनमध्ये ॲडव्हान्स एक्सपिरीयन्स साठी एडिट पोस्ट, लॉंग पोस्ट, अंडू पोस्ट, लॉन्ग व्हिडिओ पोस्टिंग, टॉप आर्टिकल्स, रीडर, बॅकग्राऊंड व्हिडिओ प्ले बॅक, डाउनलोड व्हिडिओ, स्मॉल रिप्लाय बूस्ट, फॉर यू आणि फॉलोइंग सह अर्धे ऍड फीचर्स मिळतात. त्याचबरोबर युजर्ससाठी हब साठी  गेट पॅड टू पोस्ट, क्रियेटर सबस्क्रीप्शन, एक्स प्रो, मीडिया स्टुडिओ, एनालिटिक्स यासारखे फीचर्स मिळतात. व्हेरिफिकेशन आणि सेक्युरिटीसाठी या प्लॅनमध्ये SMS 2 फॅक्टर ऑथेंटीकेशन, इन्क्रिप्टेड डायरेक्ट मेसेज, चेक मार्क आणि आयडी व्हेरिफिकेशन , कस्टमायझेशन साठी ॲप आयकॉन, बुकमार्क, फोल्डर्स, कष्टमयझेशन, नेवीगेशन, थीम, हायलाईट टॅब, लाईक, सबस्क्रीप्शन हाईड यासारखे फीचर्स या प्लॅनमध्ये देण्यात आले आहे.

प्रीमियम प्लस प्लॅन

प्रीमियम प्लस प्लॅन मध्ये ॲडव्हान्स एक्सपिरीयन्स साठी एडिट पोस्ट, लॉंग पोस्ट, अंडू पोस्ट, लॉन्ग व्हिडिओ पोस्टिंग, टॉप आर्टिकल्स, रीडर, बॅकग्राऊंड व्हिडिओ प्ले बॅक, डाउनलोड व्हिडिओ, स्मॉल रिप्लाय बूस्ट, फॉर यू आणि फॉलोइंग मध्ये विदाऊट ऍड फीचर्स मिळतात. या प्लॅनमध्ये लार्जेस्ट रिप्लाय बूस्ट देखील उपलब्ध आहे.