Elon Musk चे नवीन फर्मान!!Twitter (X) च्या वापरासाठी वर्षाकाठी द्यावे लागतील इतके पैसे

टाइम्स मराठी । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर मध्ये एलन मस्क (Elon Musk) यांनी बरेच बदल केले होते. त्यांनी ट्विटरचे नाव X असं ठेवले. आता त्यांनी X म्हणजेच ट्विटर युजर साठी महत्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता युजर्सला ट्विटर वापरण्यासाठी वर्षभरासाठी सबस्क्रीप्शन प्लॅन घ्यावा लागेल. एवढेच नाही तर जे युजर्स सबस्क्रीप्शन प्लॅन घेणार नाही त्यांना ट्विटर वापरता येणार नाही असं देखील एलन मस्क  यांनी सांगितलं. म्हणजेच आता ट्विटर वापरण्यासाठी युजर्स ला कंपल्सरी सबस्क्रीप्शन प्लॅन घ्यावा लागेल.

   

एलन मस्क यांनी घेतलेला हा निर्णय पटणारा नसला तरी देखील यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. ते कारण म्हणजे  ट्विटर वर उपलब्ध असलेले काही स्वचलित आणि फर्जी बॉट अकाउंट वर बंदी घालणे. सध्या ट्विटरवर नॉट ए बॉट या फिचरचे टेस्टिंग सुरू आहे. सध्या हे टेस्टिंग न्यूझीलंड आणि फिलिपिन्स मध्ये सुरू आहे. या ठिकाणी नवीन ट्विटर युजर्स वार्षिक शुल्क भरल्याशिवाय म्हणजेच वार्षिक सबस्क्रीप्शन प्लॅन घेतल्याशिवाय ट्विटरचा वापर करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही पोस्ट, लाईक, कमेंट बुकमार्क करू शकत नाही. याबाबत ब्ल्युमबर्ग यांनी रिपोर्ट जाहीर केला.

रिपोर्टनुसार हा एक असा शक्तिशाली उपाय आहे, ज्यामुळे बॉट आणि स्पॅमर पासून  मुक्ती मिळेल आणि ट्विटर सुरक्षित राहील. त्यानुसार आता ट्विटर वापरणाऱ्या प्रत्येक युजर्सला एक डॉलर एवढा शुल्क भरावा लागणार आहे. जे युजर्स हे शुल्क भरणार नाही  अशा युजर्सला ट्विटर वापरता येऊ शकत नाही. त्याचबरोबर ट्विटरवर नॉट ए बॉक्स फीचर लॉन्च करण्यात आल्यानंतर रेवेन्यू वाढवण्यासाठी आणखीन प्रयत्न करण्यात येणार आहे. एलन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेण्यापूर्वी ट्विटर हे तेरा अरब डॉलरच्या कर्जात बुडाले होते. परंतु मस्क हे ट्विटर पुन्हा नव्याने उभारण्याचा प्रयत्न करत असून यासाठी नवीन नवीन रिवेन्यू आजमावत आहे.