Elon Musk माणसांच्या डोक्यात बसवणार चिप; प्रोजेक्टला मिळाली परवानगी 

टाइम्स मराठी । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये असलेले उद्योगपती, आणि  ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव  आणि त्यांच्या हटके करण्याच्या अंदाजावरून चर्चेत राहतात. ट्विटर मध्ये त्यांनी बरेच बदल केले असून एलन मस्क यांचे दुसरे स्टार्टअप Neuralink ला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता एलन मस्क एका प्रोजेक्टच्या माध्यमातून काही दिवसांमध्ये ह्यूमन ट्रायल करणार आहे. हा आतापर्यंतचा त्यांचा सर्वात मोठा प्रोजेक्ट असेल. आता ते काय नवीन करणार आहे हे पाहूयात.

   

काय आहे हा प्रोजेक्ट

एलन मस्क यांनी एक असा प्रोजेक्ट तयार केला आहे, जो संपूर्ण मानव जातीला वरदान ठरू शकेल. या प्रोजेक्टच्या माध्यमातून मानवी मेंदूमध्ये चीप बसवण्यात येणार आहे. आणि ही चीफ बसवल्यानंतर मनुष्याला नवीन पावर मिळेल. या प्रोजेक्टच्या माध्यमातून मानवी परीक्षण करण्यासाठी अमेरिकेच्या फूड आणि ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन कडून एलन मस्कच्या प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली आहे.

BCI या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून चिप प्रत्यारोपित करणार

Neuralink च्या क्लिनिकल ट्रायल नुसार, मेंदू संगणक इंटरफेस BCI या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून मेंदूच्या जवळ चिप प्रत्यारोपित केली जाणार आहे. चीप प्रत्यारोपण केल्यानंतर या चिपच्या हालचालींचे निरीक्षण केले जाईल. त्यानंतर कॉम्प्युटरच्या मदतीने मेंदूच्या जवळ बसवलेल्या चीपला कंट्रोल करण्यात येणार आहे. मेंदूमध्ये चीप बसवण्याचा हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर बऱ्याच मानवी विकारांवर मात करणे शक्य होईल. यासोबतच अर्धांगवायू, मेंदू विकार, अल्झायमर, पाठीच्या कानाच्या दुखापती या सर्व आजारांपासून मानवाची सुटका होईल. एवढेच नाही तर स्मृतिभंग, नैराश्य, निद्रानाश यावर देखील तोडगा निघेल.

2016 पासून सुरू आहे काम

Neuralink कंपनीने 2016 पासूनच कॉम्प्युटर चीप मानवी मेंदूमध्ये बसवण्याच्या प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी Neuralink मध्ये काम करावं असं आवाहन देखील एलन मस्क यांनी केलं आहे. याशिवाय बरेच व्यक्ती ह्यूमन ट्रायल साठी तयार झाले असून हा प्रोजेक्ट आता  लवकरच प्रत्यक्षात सुरू करण्यात येईल. Neuralink या कंपनीने 2030 पर्यंत 22,000 लोकांच्या मेंदूमध्ये ही चिप बसवणार असल्याचे उद्दिष्ट समोर ठेवलं आहे.