Elon Musk ची Wikipedia ला 1 अब्ज डॉलर्सची ऑफर; पण ठेवली ही मोठी अट

टाइम्स मराठी । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये असलेले उद्योगपती, आणि एक्स म्हणजेच ट्विटरचे मालक Elon Musk हे त्यांनी ट्विटर वर केलेल्या पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. ट्विटरवर करण्यात आलेल्या सततच्या बदलांमुळे एलोन मस्क हे सातत्याने चर्चेत असतात. त्यातच आता मस्क यांच्याबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. Elon Musk यांनी Wikipedia ला तब्बल 1 अब्ज डॉलर्सची ऑफर दिली आहे. परंतु यासाठी विकिपीडिया वेबसाईटने आपले नाव बदलून डिकिपीडिया असे नाव ठेवावे, अशी अट देखील एलन मस्क यांनी घातली आहे. याबाबत त्यांनी एक्स वर पोस्ट करून माहिती दिली.

   

204 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक असलेले एलन मस्क यांनी यावर्षी मायक्रो ब्लोगिंग साईट म्हणजेच ट्विटर हे विकत घेतले. आणि या ट्विटर चे नाव बदलून एक्स देखील केले. त्यानंतर त्यांनी ट्विटर मध्ये बरेच बदल करत युजर साठी वेगवेगळे सबस्क्रीप्शन प्लॅन देखील उपलब्ध केले. आता एलन मस्क यांनी विकिपीडिया च्या नावावरून ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले की, विकिपीडिया या वेबसाईटने त्यांच्या नावामध्ये बदल करून डिकिपीडिया असे ठेवले पाहिजे, असे केल्यास मी त्यांना अब्ज डॉलर्स देईल. एलोन मास्क यांनी केलेल्या पोस्टवर बऱ्याच नेटिजन्सने कमेंट्स केल्या आहेत.

ट्विटर वर केलेल्या पोस्टवर एक नेटीझन म्हणाला की, विकिपीडियाचे नाव बदला आणि पैसे मिळाल्यानंतर तुम्ही लगेच जुने नाव परत वापरा. यावर एलन मस्क यांनी कमेंट करून सांगितले की, विकिपीडियाला किमान वर्षभर तरी नवीन नावासह इंटरनेटवर अस्तित्वात राहावे लागेल. मी मूर्ख नाही. या सोबतच एलन मस्क यांनी आणखीन एका ट्विटमध्ये विकिपीडियाच्या होमपेजचा स्क्रीनशॉट शेअर करत, विकिपीडियाचे सह संस्थापक जिमी वेल्स यांच्या वतीने ‘विकिपीडिया विक्रीसाठी’ नाही असे आवाहन देखील केले.

यावर्षी मे महिन्यामध्ये विकिपीडियाचे सह संस्थापक जिमी वेल्स यांनी मस्क यांच्यावर टीका केली होती. यावेळी तुर्की मध्ये अध्यक्षीय निवडणुकीच्या एक दिवस पूर्वी ट्विटर ने रिसेप तय्यब एर्दोगान वरील टीका सेंसोर केल्याचा आरोप वेल्स यांनी केला होता. त्याचबरोबर दोन वर्षापूर्वी तुर्की मध्ये विकिपीडियावर बंदी घालण्यात आली होती. यामुळेच एलन मस्क यांनी हा निर्णय घेतला असावा असं बोललं जात आहे.

विकिपीडिया ही वेबसाईट सर्वात मोठी माहिती देणारी साईट आहे. विकिपीडिया पूर्णपणे फ्री असल्यामुळे वेबसाईटवर जाहिराती देखील उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. म्हणून विकिपीडिया ऑपरेट करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये खर्च लागत आहे. यामुळे बऱ्याच महिन्यांपासून विकिपीडिया वेबसाईट नेटीझन कडून पैसे मागत आहे. त्यामुळे एलोन मस्क यांनी विकिपीडियाला पैसे ऑफर केले असेल. असं सांगण्यात येत आहे.