Elon Musk यांची कंपनी भारतात पुरवणार Internet सर्व्हिस; Jio- Airtel चं टेन्शन वाढणार

टाइम्स मराठी । आज-काल सर्व ठिकाणी 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध आहे. अशातच आता भारतात इंटरनेटचे तुफान येण्याची शक्यता आहे. कारण आता Airtel आणि Jio नंतर आणखीन एक कंपनी सॅटेलाईट इंटरनेट सुविधा उपलब्ध करत आहे. ही कंपनी म्हणजे एलोन मस्क (Elon Musk) यांची स्टारलिंक कंपनी. लवकरच ही कंपनी भारतात एन्ट्री करणार असल्याने एअरटेल आणि जिओ कंपनीचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

   

एलोन मस्क यांनी यापूर्वी देखील परवानगी न घेता सर्व्हिस सुरू केली होती. परंतु त्यानंतर कंपनीवर बंदी घालण्यात आली होती. आता त्यांनी सरकारी मंत्रालयाची मंजुरी घेऊन स्टारलिंक सर्विस लॉन्च करणार असल्याचं सांगितलं. 2021 मध्ये लायसन न घेता या कंपनीने सर्व्हिस सुरू केलेली होती. आणि प्री ऑर्डर म्हणून ग्राहकांकडून पैसे देखील जमा करण्यात आले होते. परंतु भारत सरकारकडून मंजुरी न मिळाल्यामुळे एलोन मस्क यांना हा प्रकल्प बंद करावा लागला होता.

एअरटेल कंपनी वन वेब सोबत सॅटॅलाइट सर्विस लॉन्च करत आहे. आणि जिओ कंपनीने SES सोबत सॅटॅलाइट सर्विससाठी पार्टनरशिप देखील केली आहे. यानुसार एअरटेल आणि जिओ सॅटॅलाइट इंटरनेट सर्विस देणाऱ्या कंपन्यांमध्ये सहभागी आहेत. आता एलन मस्क यांच्या स्टारलींक सर्विस मुळे जिओ आणि एअरटेल दोन्ही कंपन्यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

स्टारलिंक ही एक सॅटेलाईट सर्विस आहे. यामुळे या सर्विसला मोबाईल टॉवरची गरज नाही. सॅटेलाईट सर्विसच्या माध्यमातून देशातील ज्या भागात इंटरनेट सेवा आणि मोबाईल टॉवर उपलब्ध नाही त्या ठिकाणी इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी मदत होईल. स्टार लिंक सध्या 40 पेक्षा जास्त देशांमध्ये सर्विस देत आहे. स्टार लिंग सॅटेलाईट इंटरनेट सर्विसचे टॉप स्पीड 1.5 ते 2 Gbps एव्हडं आहे. या स्टार लिंक सर्विस मध्ये वायफाय राउटर, पावर सप्लाय, केबल आणि माउंटिंग ट्रायपॉड दिला जातो. हे राऊटर सॅटेलाईटला कनेक्टेड असते.