Elon Musk ची मोठी घोषणा!! X वर Free मध्ये मिळणार प्रीमियम फीचर्स

टाइम्स मराठी । ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी ट्विट हातात घेतल्यानंतर त्यात अनेक नवनवीन बदल केलेत. सर्वात आधी एलोन मस्क यांनी ट्विटरचा नाव बदलून X केलं. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर ब्लु टिक सह प्रीमियम सेवा सुरू करण्यासाठी यूजर्स कडून चार्जेस घेणं सुरु केलं. त्यामुळे एलोन मस्क यांच्याविरोधात अनेकांनी नाराजी दर्शवली. मात्र आता एलोन मस्क यांनी एक नवीन घोषणा करत आपल्या वापरकर्त्यांना दिलासा दिला आहे. एलोन मस्क यांनी आपल्या वापरकर्त्यांसाठी प्रीमियम आणि प्रीमियम प्लस सेवा विनामूल्य देण्यात येणार असल्याचे जाहीर केलं आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.

   

काय आहे मस्क यांची नेमकी घोषणा –

ज्या X वापरकर्त्यांचे 2,500 सब्सक्राइबर्स फॉलोअर्स आहेत त्यांना X प्रीमियमची सुविधा अगदी मोफत मध्ये मिळणार आहे तर ज्या यूजर्सचे 5,000 फॉलोअर्स आहेत अशा वापरकर्त्यांना प्रीमियम प्लसची सुविधा फ्री मध्ये देण्यात येणार आहे. एलोन मस्क यांनी आपल्या X अकाउंट वर याबाबत माहिती दिली आहे. भारतात सध्या X Premium + चे सब्सक्रिप्शन घेण्यासाठी, वापरकर्त्यांना प्रति वर्ष 13,600 रुपये द्यावे लागत आहेत.

प्रीमियम सब्सक्रिप्शन मध्ये काय सुविधा मिळतात –

प्रीमियम सब्सक्रिप्शन मध्ये X अकाउंटवर यूजर्सना ब्लु टिक मिळते. तसेच कमी जाहिराती, पैसे कमवण्याची संधी, मोठमोठे रिप्लाय, आईडी वेरिफिकेशन, मीडिया स्टुडिओ यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या प्लॅनसाठी 8 डॉलर म्हणजेच सुमारे 650 रुपये दर महिन्याला द्यावे लागतील.

प्रीमियम+ सब्सक्रिप्शन मध्ये काय सुविधा मिळतात-

प्रीमियम+ सब्सक्रिप्शन प्रीमियमच्या सर्व सुविधेव्यतिरिक्त तुम्हाला जाहिरातींशिवाय टाइमलाइन, आर्टिकलचा ऍक्सेस मिळतो. या प्लॅनसाठी 16 डॉलर म्हणजेच सुमारे 1,300 रुपये दर महिन्याला द्यावे लागतील