तुमच्या मोबाईलवर अजूनही Emergency Alert येतोय? घाबरू नका, ‘हे’ आहे कारण

टाइम्स मराठी । काही दिवसांपासून संपूर्ण देशात मोबाईलच्या माध्यमातून भारत सरकारकडून इमर्जन्सी अलर्ट मेसेज पाठवण्यात येत आहे. हा मेसेज आल्यास मोठ्याने मोबाईलचा आवाज होत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होत आहे. परंतु यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसून सरकारच्या माध्यमातून सध्या इमर्जन्सी अलर्ट सिस्टीमची टेस्टिंग (Emergency Alert) करण्यात येत आहे. या टेस्टिंगच्या माध्यमातून युजरच्या मोबाईलवर अलर्ट नावाचा मेसेज येत आहे.

   

हिमाचल प्रदेशामध्ये मुसळधार पाऊस आणि उत्तराखंडमध्ये संध्याकाळी हवामान वेगाने बदलू शकते. या संदर्भात बऱ्याच युजर्सच्या मोबाईल मध्ये भारत सरकारकडून हवामानाबाबत आधीच अलर्ट आला आहे. जर तुम्हाला देखील असाच मेसेज आला असेल तर घाबरून जाऊ नका. भारत सरकारकडून एक उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला अलर्ट मेसेज मिळत आहे. हा उपक्रम नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांच्याकडून तयार करण्यात आलेला असून त्याद्वारे युजर्सच्या मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट मेसेज येतो. सध्या याची टेस्टिंग सुरू असून हा मेसेज आल्यावर मोठ्याने बीप साऊंड देखील ऐकू येतो.

या ऑथॉरिटी कडून भारतातील हवामानाबाबत आपत्कालीन सूचना मेसेजच्या माध्यमातून पाठवते. या मेसेजच्या माध्यमातून विशिष्ट आपत्तीच्या वेळी लोकांना सतर्क करण्याचे काम केल्या जाते. जिओ आणि बीएसएनएल ग्राहकांना दुपारी दीड वाजता हवामानाच्या अलर्ट चा फ्लॅश मेसेज पाठवण्यात आला होता. हा मेसेज दूरसंचार विभागाद्वारे C-Dot म्हणजे सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टीमच्या मदतीने पाठवण्यात आला.

या C -Dot चे सीईओ, राजकुमार उपाध्याय यांनी सांगितलं की, ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी फॉरेन वेंडर यांच्याकडून मिळत असून इन हाऊस ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यात येत आहे. यासोबतच सेल ब्रॉडकास्टिंग टेक्नॉलॉजी वर सध्या काम सुरू असून या टेक्नॉलॉजी मुळे इमर्जन्सी च्या वेळेस प्रत्येक घरात मेसेज पाठवला जाईल. यामुळे एखादी घटना घडण्यापूर्वी लोकांना त्याची माहिती मिळेल. सध्या ही टेक्नॉलॉजी फक्त जिओ आणि बीएसएनएल मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.