Energizer P28K : मित्रानो, मोबाईल म्हंटल कि आपण अंदाज लावतो कि त्यामध्ये ५०००mAh बॅटरी किंवा ६०००mAh बॅटरी असेल., मोबाईल कितीही महाग आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असला तरी त्यामध्ये जास्तीत जास्त ७०००mAh बॅटरी तुम्ही पाहिली असेल. पण लवकरच बाजारात एक असा मोबाईल लाँच होणार आहे ज्याची बॅटरी तब्बल 28,000mAh इतकी असणार आहे. Energizer P28K असे या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल एकदा फुल्ल चार्ज केल्यास तुम्हाला १० दिवस चार्जिंगचे टेन्शन घेण्याची गरज लागणार नाही.
26 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या MWC 2024 मध्ये 28,000mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन सादर केला जाईल. हा मोबाइल Energizer ब्रँड द्वारे लाँच केला जाईल. Energizer ने या स्मार्टफोनचा टीझर रिलीज केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे Energizer ने यापूर्वी सुद्धा मार्केट मध्ये १८०००mAh बॅटरी असलेला मोबाईल लाँच केला होता ज्याचे नाव Energizer P18K असं होतं. परंतु Energizer हा ब्रँड भारतात चालत नाही, त्यामुळे Energizer P28K स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाणार नाही.
Energizer P28K चे फीचर्स –
या मोबाईलचे सर्व फीचर्स काही समोर आलेले नाहीत. परंतु, Energizer P28K मध्ये कंपनीने 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले फुल HD पिक्सेल रिझोल्यूशनवर काम करेल.याशिवाय मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. ज्यामध्ये 60MP मुख्य कॅमेरा आणि 20MP सेकंडरी कॅमेरा असेल. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. मोबाईल मध्ये 28,000mah ची दमदार आणि जम्बो बॅटरी देण्यात आली असून कंपनीचा दावा आहे कि हा मोबाईल एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर १० दिवस आरामात चातेल. त्यामुळे कुठेही तुम्ही फिरायला गेलात तरी चार्जिंगच अजिबात टेन्शन राहणार नाही.