Enfit NEO आणि Enfit NEO Pro स्मार्टवॉच लाँच; पहा किंमत

टाइम्स मराठी । दुबई स्थित टेक कंपनी ENDEFO ने दोन नवीन स्मार्टवॉच मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टवॉच Apple वॉच प्रमाणेच दिसत असून कंपनीने या स्मार्टवॉच मध्ये 135 पेक्षा जास्त स्पोर्टस मोड उपलब्ध केले आहेत. या दोन्ही स्मार्टवॉच  ENFIT NEO सिरीज मधील Enfit NEO आणि Enfit NEO Pro स्मार्टवॉच आहेत. कंपनीने हे स्मार्टवॉच 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केलं असून भारतातील 2000 पेक्षा जास्त रिटेल स्टोअर्स वर उपलब्ध सुद्धा करण्यात आले आहे. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टवॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

ENFIT NEO या स्मार्टवॉच मध्ये 1.9 इंच चा डिस्प्ले देण्यात आला आहे. आणि ENFIT NEO PRO या स्मार्टवॉच मध्ये 2.01 इंच डिस्प्ले मिळतो. कंपनीने दोन्ही स्मार्टवॉच मध्ये 6000 nits पीक ब्राईटनेस दिला आहे.या स्मार्टवॉच मध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट उपलब्ध आहे. जेणेकरून तुम्ही सहजरीत्या कॉल रिसिव्ह आणि डिस्कनेक्ट करू शकता.

फिचर्स

ENFIT NEO आणि ENFIT NEO PRO या दोन्ही स्मार्टवॉच मध्ये 135 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड, 200 पेक्षा जास्त वॉच फेसेस मिळतात. या दोन्ही स्मार्टवॉच मध्ये लाईव्ह हार्ट रेट मॉनिटर, ब्लड प्रेशर आणि ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंग यासारखे हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहे. याशिवाय कॅमेरा कंट्रोल,  लॅंग्वेज, ड्युअल स्क्रीन, व्हॉइस असिस्टंट आणि UI मोड सपोर्ट देखील यामध्ये उपलब्ध आहे.

किंमत किती?

ENFIT NEO आणि ENFIT NEO PRO स्मार्टवॉच च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर  ENFIT NEO या स्मार्टवॉच ची किंमत 6,999 रुपये आहे. परंतु तुम्ही हे स्मार्टवॉच 1999 रुपयात खरेदी करू शकतात.  ENFIT NEO pro या स्मार्टवॉच ची किंमत 7999 रुपये आहे. परंतु तुम्ही हे स्मार्टवॉच 2499 रुपयात खरेदी करू शकता. तुम्ही हे दोन्ही स्मार्टवॉच भारतातील 2000 पेक्षा जास्त रिटेल स्टोअर्सवर खरेदी करू शकता. यामध्ये मुंबई, गुजरात, यूपी, दिल्ली या शहरांचा समावेश आहे.