Ethanol Fuel Car : 29 ऑगस्टला येणार Ethanol वर चालणारी गाडी; नितीन गडकरी करणार उद्घाटन

टाइम्स मराठी | पेट्रोल आणि डीझेलची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. या गाड्याच्या अती वापरामुळे पर्यावरणाला सुद्धा धोका निर्माण होत आहे. आपल्याकडे Public Transport ची उत्तम सोय असून देखील, स्वतःची गाडी घेऊन फिरण्याची मात्र वेगळीच इच्छा असते. मग कारणाशिवाय पेट्रोल आणि डिझेलचा अतिवापर होऊ लागतो. अश्यावेळी बाजारात आलेल्या Electric गाड्या जास्त सोयीस्कर वाटतात. electric गाड्यांना अनेकांकडून मागणी येत आहे. सरकार देखील ह्या नवीन उपक्रमाला प्रोत्साहन देत आहे. त्यातच आता देशात Ethanol वर चालणारी गाडी येणार (Ethanol Fuel Car) आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः या गाडीचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे देशात ऑटोमोबाइल क्षेत्रात नव पर्व पाहायला मिळू शकते.

   

मिंट सस्टेनेबिलिटी कॉन्फरन्सला संबोधित करताना गडकरी यांनी याबबात माहिती देत म्हंटल की २९ ऑगस्ट रोजी मी स्वतः ह्या शंभर टक्के Ethanol fuel वर चालणाऱ्या Toyota Innova चे उद्घाटन करणार आहेत. ही कार देशातील पहिली BS-6 (stage-2) electrified flex-fuel वापरणारी असणार आहे. विशेस म्हणजे गेल्या वर्षी हायड्रोजनवर चालणारी टोयोटा मिराई ईव्ही ही कार गडकरी यांनी सादर केली होती

Ethanol म्हणजे काय?

Ethanol हे एका प्रकारचे इंधन आहे ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत नाही. इथेनॉल हे प्रामुख्याने भात, मका आणि ऊस या पिकांपासून तयार केले जाते. तसेच साखरेच्या उत्पादनावेळी तयार होणारा हा उपप्रकार आहे. ह्याचे उत्पादन घरगुती असल्यामुळे या इंधनाची किंमत फारच कमी असते. हे एका प्रकारचे Alcohol आहे ज्याला काही प्रमाणात पेट्रोल मध्ये मिसळून इंधन म्हणून वापरल जातं.

का सुरु झाला Ethanol चा प्रवास? Ethanol Fuel Car

वर्ष 2004 पासून देशात पेट्रोलच्या किंमतीत वाढ होत होती. ही वाढ काही सर्व सामान्य लोकांना परवडणारी नव्हती, तसेच यामुळे पर्यावरणाला पोचणारा धोका सुद्धा अफाट होता. कुठे न कठे थांबत नवीन पर्याय शोधण्याची गरज होती. आपण पेट्रोल बाहेरच्या देशातून विकत घेतो त्यामुळे ह्या आविष्काराचा आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे. सध्या १६ लाख करोड रुपये आपण केवळ पेट्रोल विकत घेण्यात खर्च करत आहोत. देशात प्रदूषण ही वाढणारी समस्या बनलेली आहे व म्हणून आपल्याला नेहमीच अश्या पर्यायची गरज होतीच. आणि आता ह्या Ethanol च्या गाडीमुळे मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. ethanol वर चालणाऱ्या Toyota Innova मध्ये की फीचर्स असतील किंवा कंपनी किती प्रोडक्शन करणार आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. 29 ऑगस्टलाच ते संजू शकेल.