दुसऱ्या ग्रहावर डायनासोरचे अस्तित्व?? संशोधनातून झाले उघड 

टाइम्स मराठी । इतिहास पूर्व काळामध्ये पृथ्वीवर डायनासोर मोठ्या प्रमाणात होते. आता डायनासोर नष्ट झाले आहे. परंतु नवीन संशोधनाच्या माध्यमातून असे समोर आलं आहे कि कदाचित इतर कोणत्या ग्रहावर डायनासोरचे अस्तित्व असू शकत. वैज्ञानिकांच्या टीमने हा दावा केला आहे. या वैज्ञानिकांच्या टीमनुसार ही प्रजाती पृथ्वीपासून दूर असलेल्या दुसऱ्या ग्रहावर टिकून राहू शकते. असा अंदाज लावण्यात येत आहे. याबाबत रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी जर्नल च्या मासिकामध्ये दावा करण्यात आला आहे.

   

रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी जर्नलच्या मासिकेत लीसा कॅटलेनेगर यांनी डायनासोरच्या अस्तित्वाबाबत  लिखाण केले आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या की, पूर्वी दुसऱ्या ग्रहांवर जीवन शोधण्यासाठी पृथ्वीवरून मिळालेल्या पुराव्यांना साक्षी मानले जात होते. परंतु आता टेक्नॉलॉजी प्रचंड वाढली आहे. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून दुसऱ्या ग्रहावर नवीन प्रजाती शोधण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबर राहण्या योग्य ग्रहांबद्दलची सध्याची समज पृथ्वीच्या वेगळ्या प्रकाशाच्या फिंगरप्रिंटने प्रभावित झाली आहे. एकेकाळी हे फिंगरप्रिंट एवढे स्ट्रॉंग होते की, जीवनाची चिन्हे शोधणे सोपे जात होते.

नवीन संशोधनानुसार, वैज्ञानिक बाकीच्या ग्रहावर  जुरासिक वर्ल्डचा  शोध घेऊ शकतात. त्यासाठी सर्वात अगोदर संशोधकांना अशा कंपोनंट्स चा शोध घ्यावा लागेल, जे कंपोनंट्स आज पृथ्वीवर उपलब्ध नाहीत. परंतु जुरासिक काळामध्ये पृथ्वीवर उपलब्ध होते. डायनासोर च्या काळात ऑक्सिजनची पातळी ही इतर ग्रहावर जटिल जीवनाच्या अस्तित्वासाठी अचूक काम करू शकते. असं या संशोधनातून उघड झाले आहे.

डायनासोरच्या काळात पृथ्वीवर ऑक्सिजनची पातळी सुमारे 30% एवढी  होती. सध्या पृथ्वीवरील ऑक्सिजनची पातळी ही 21% एवढी आहे. जर इतर ग्रहावर डायनासोर सारख्या प्रजातींचे जीवन शोधायचे असेल तर ॲडव्हान्स दुर्बीण वापरणे हा एक मार्ग होऊ शकतो.  या मोहिमेमध्ये एखादा ग्रह phanerozoic स्टेज मध्ये आहे की नाही, आणि आहे तर  त्याला डायनोसॉर च्या अस्तित्वाचा स्त्रोत असलेल्या मोठ्या आणि जटिल जीवनाचे आयोजन करण्याची अनुमती देईल. असं संशोधक म्हणाले.

phanerozoic हा पृथ्वीच्या इतिहासामधील अलीकडचा 12 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त काळ आहे. या काळामध्ये जिवाणू, स्पंज पेक्षा  जीवसृष्टी जास्त गुंतागुंतीची होती. कॉर्नर युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ रेबिका पायने यांनी द सन  यांना सांगितलं की, ब्रम्हांडात इतर जीवनाची चिन्हे शोधणे, मोठे किंवा गुंतागुंतीचे जीवन शोधणे थोडे सोपे होईल याबाबत विश्वास मिळतो. यावर कॅटलेनेगर म्हणतात की, ऑक्सीजन ची उच्च पातळी असलेले ग्रह शोधणे यासाठी दुसरी आणखीन पद्धत असू शकते. ऑक्सीजन ची उच्च पातळी असलेले ग्रह फक्त मनोरंजक जीवसृष्टी शोधून काढत नाही तर प्रक्रिया थोडी सोपी देखील करू शकतात.