Express Highway : मध्यरात्री TAXI ला हात करून गाडीत बसले; नंतर सुनसान जागा पाहून ड्राइव्हरसोबत केलं ‘असं’ काही…

टाइम्स मराठी टीम । सध्या चोरीच्या हाणामारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. यातच सोमवारी रात्री देशाची राजधानी दिल्ली येथे एक हादरून सोडणारी घटना घडली आहे. ग्रेटर नोएडा या एक्सस्प्रेस हायवेवर चालत्या वाहनात ड्राईव्हरला किडनॅप करून त्याच्यासोबत भयानक कृत्य करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या घटनेने देशाची राजधानीही आता सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.

   

हाती आलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील एक्सप्रेस हायवेवर चार अज्ञातांनी एका चारचाकी वाहनाला हात करून थांबवले. यानंतर ड्राइव्हरला लिफ्ट मागून ते त्या गाडीत बसले. गाडी सुनसान भागात असताना अज्ञातांनी त्यांचा खरा चेहरा उघड केला. गाडीतील मौल्यवान वस्तू घेऊन कॅब चालकाला मारहाण करून परी चौकात फेकून दिले. यानंतर हल्लेखोर चालत्या वाहनातून ड्राइव्हरला रस्त्यावर फेकून निघून गेले.

सोमवारी दिल्ली वरून बुलंद शहर येथे जात असताना रात्री 1.30 वाजता सेक्टर 37 या ठिकाणी प्रवाशांची वाट बघत थांबले होते. तेवढ्यात 4 मुलं तिथे येऊन थांबले. घरातील सदस्य आजारी आहेत असं सांगत परी चौकात आम्हाला सोडा असं त्यांनी सांगितलं. यानंतर कॅब चालकाने त्यांना कॅब मध्ये बसवलं आणि तो कॅब चालवू लागला. काही अंतरावर गेल्यावर त्या चार तरुणांनी त्यांच्याकडे असलेले हत्यार काढून कॅब चालकाला मारण्यास सुरुवात केली. कार मध्ये असलेला सर्व किंमत सामान त्यांनी काढून घेतले. यानंतर परी चौकात चालत्या गाडीतून कॅब चालकाला फेकून ते कॅब घेऊन फरार झाले. कॅब मध्ये कॅब ड्राइव्हरचं ड्रायव्हिंग लायसन्स सह मोबाईल सुद्धा होता.

हे हल्लेखोर सेक्टर 37 या ठिकाणी प्रवासी बनून टॅक्सी मध्ये बसले होते. पोलीस या घटनेचा तपास करत असून त्या हल्लेखोरांवर चोरीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चंदन आनंद नामक कॅब ड्राइव्हर ती कॅब चालवत होते. बुलंद शहर मधील आंबा कॉलनी मध्ये ते राहतात. त्यांनी त्यांची कार कॅब म्हणून बुक केलेली आहे. ते ती कॅब म्हणूनच चालवतात. कॅब चालकाने सांगितलं की तीन वर्षा पूर्वी तो एक अँप बेस्ट बुकिंग मध्ये कॅब चालवत होता. आता तो दुसऱ्या बुकिंग वर कॅब घेऊन जातो.

ही घटना घडली त्या रात्री एकही पोलीस गस्ती साठी रोड वर नव्हते असं त्या कॅब चालकाचे म्हणणे होते. एसीपी रजनीश वर्मा ने सांगितलं की कार चालकाच्या म्हणण्या नुसार केस करण्यात आलेली आहे. पोलीस या घटनेतील आरोपीनाशोधण्याचा प्रयत्न करत आहे.