Facebook ने लाँच केलं नवं फीचर्स; एकाच वेळी बनवा 4 प्रोफाइल

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये Whatsapp, Instagram, Youtube, Facebook यासारखे बरेच ॲप्स यात येतात. Whatsapp आल्यापासून Facebook फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजरचे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. काही दिवसांपूर्वी मेटाने फेसबुक चा लोगो, वर्ल्ड मार्क आणि रिएक्शन इमोजी पुन्हा डिझाईन केला. आता फेसबुकने युजर साठी मल्टीपल पर्सनल प्रोफाइल फीचर लॉन्च केले आहे.

   

मेटा कंपनीने फेसबुक मध्ये आधुनिक बदल करत वेगवेगळे फीचर्स लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फेसबुक मध्ये एक नवीन फीचर ऍड करण्यात आले आहे. मल्टिपल पर्सनल प्रोफाइल फीचर्स च्या माध्यमातून तुम्ही फेसबुक ॲप वर मल्टिपल प्रोफाइल बनवू शकतात. एवढेच नाही तर तुमची फीड देखील कस्टमर करू शकतात. या फीचरच्या माध्यमातून तुम्हाला तुम्ही कोणत्या व्यक्तींना कंटेंट शेअर केला आहे हे देखील समजेल.

मल्टिपल प्रोफाइल फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही फेसबुकवर ४ प्रोफाइल बनवू शकतात. त्यासाठी तुम्हाला डबल डबल लॉगिन करण्याची गरज भासणार नाही. यापूर्वी फेसबुक मध्ये दुसरी प्रोफाईल ओपन करण्यासाठी लॉगिन करावे लागत होते. परंतु आता मल्टिपल पर्सनल प्रोफाइलच्या माध्यमातून तुम्हाला डबल डबल लॉगिन करावे लागणार नाही.

मल्टिपल पर्सनल प्रोफाइल या फीचरच्या माध्यमातून बरेच फायदे युजर्स ला होऊ शकतात. त्यापैकी तुम्ही या फीचर्स च्या माध्यमातून पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ पोस्ट वेगवेगळे करू शकतात. एवढेच नाही तर एका प्रोफाईल मध्ये तुम्ही तुमचे नातेवाईक आणि स्पेशल मित्रांना ऍड करू शकतात. आणि बाकीच्या प्रोफाईल मध्ये तुम्ही बाकी लोकांना जोडू शकतात.

तुम्हाला देखील मल्टिपल पर्सनल प्रोफाइल या पिक्चर चा लाभ घ्यायचा असेल तर पुढील स्टेप फॉलो करा,

1) फेसबुकच्या प्रोफाईल सेक्शन मध्ये जा.
2) सर्वात वर तुम्हाला प्रोफाइल क्रिएट करा हे ऑप्शन दिसेल.
3) त्या ऑप्शन वर क्लिक करा. आणि तुमचे नाव एंटर करा.
4) त्यानंतर अशा खास मित्रांना जोडा ज्यांना तुम्ही तुमच्या नवीन प्रोफाइल मध्ये ऍड करू इच्छित आहात.
5) या नवीन प्रोफाइल मध्ये तुम्ही ग्रुप आणि पेज देखील ऍड करू शकतात.