Facebook Messenger वापरणाऱ्या यूजर्सना धक्का; ‘हे’ फीचर्स होणार बंद

टाइम्स मराठी (Facebook Messenger)। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आज काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक यासारखे बरेच ॲप्स यात येतात. व्हाट्सअप आल्यापासून फेसबुक फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजरचे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. परंतु आता याच फेसबुक युजर्सला मोठा धक्का बसणार आहे. कारण लवकरच फेसबुक मेसेंजर वरून एक फीचर काढून टाकण्यात येणार असल्याचे उघड झालं आहे.

   

कोणते फीचर्स काढून टाकणार- (Facebook Messenger)

फेसबुक या ॲपवर मोठ्या प्रमाणात युजर्स ऍक्टिव्ह असतात. हे युजर्स फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट, फोटो अपलोड, मेसेज साठी मेसेंजर चा वापर करतात. परंतु आता फेसबुक या ॲप मधून एक फिचर काढून टाकण्यात येणार आहे. 2016 मध्ये मेटाने स्मार्टफोन मध्ये एसएमएस आणि मेसेंजर चे एकत्रीकरण केले होते. आता सात वर्षानंतर हे फिचर लवकरच बंद करण्यात येणार आहे. फेसबुक मेसेंजर वरून SMS सपोर्ट फिचर काढून टाकण्यात येणार आहे.

Facebook Messenger लॉगिन करताना सर्वात पहिले तुम्हाला एसएमएस आणि मेसेंजर एकत्र करायचे आहे की नाही हा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर तुम्ही हो म्हणल्यास तुम्हाला एसएमएस आणि फेसबुक मेसेंजर यावरील मेसेज एकत्रित दिसतात. फेसबुक मेसेंजरमध्ये एसएमएस हे जांभळ्या रंगात दिसतात तर फेसबुक वर आलेले मेसेज हे निळ्या रंगांमध्ये दिसतात. परंतु आता 28 सप्टेंबर 2023 पासून हे फिचर बंद करण्यात येणार आहे.

फेसबुक ने हे फिचर बंद केल्यानंतर तुम्हाला एसएमएस सुविधांसाठी फक्त मोबाईल मध्ये असलेले डिफॉल्ट मेसेजिंग ॲप वापरावे लागेल. जर तुम्ही नवीन डिपॉल्ट मेसेजिंग ॲप निवडले नाही तर एसएमएस ऑटोमॅटिकली गुगल मेसेज ॲप मध्ये सेव्ह होईल. आणि बंद केल्यानंतर दोन पर्याय युजर समोर देण्यात येतील. पहिला म्हणजे तुम्ही गुगल मेसेज या सारख्या दुसऱ्या ॲपवर स्विच करा. आणि दुसरा म्हणजे मोबाईल मध्ये येणारे डिफॉल्ट एसएमएस निवडा.