Facebook New Logo | सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आज काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये Whatsapp, Instagram, Facebook तसेच Youtube, यासारखे बरेच ॲप्स यात येतात. Whatsapp आल्यापासून फेसबुक फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजरचे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. आता मेटाने फेसबुकचा लोगो, वर्ल्ड मार्क आणि रिएक्शन इमोजी पुन्हा डिझाईन केला आहे. त्यानुसार आता फेसबुकवर आपल्याला नवीन लोगो दिसेल.
कसा आहे फेसबुकचा नवा लोगो? Facebook New Logo
फेसबुकच्या या नवीन लोगोमध्ये आपल्याला जुन्या लोगो प्रमाणेच कलर आणि वर्ड मार्क दिसेल. कंपनीने फक्त लोगो मध्ये ब्ल्यू कलर जास्त डार्क पद्धतीने दाखवला आहे. आणि f स्मॉल लेटर मध्ये दाखवलं आहे.तसेच वर्ड मार्कला देखील फेसबुक सेन्स फॉन्टमध्ये बदलण्यात आले आहे. हे कॉस्मेटिक अपग्रेड करत नवीन लोगो हा पहिला पेक्षा थोडासा चेंज वाटतो. कारण यामध्ये टायपोग्राफीमध्ये बदल करण्यात आला आहे.
फेसबुक लोगो बदलल्यानंतर कंपनीने सांगितले की, आमचे लक्ष फेसबुक लोगो एक बोल्ड, अधिक आकर्षक, जास्त काळ टिकणारा रीडिझाईन असणे हे होते. नवीन लोगो मध्ये f ला वेगळे दाखवण्यासाठी बऱ्याच कॉन्ट्रास्ट वापरण्यात आले आहे. लोगोच्या पाठीमागे असलेल्या मेन तीन डॉटवर कंपनीने जास्त लक्ष दिले आहे.
मेटाने फेसबुकचा लोगो बदलून (Facebook New Logo) रिएक्शन आणि इमोजी देखील नवीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केले आहेत. ज्यामुळे या लोगोला नवीन डिझाईन देण्यात आली. हे नवीन इमोजी पुढच्या महिन्यामध्ये युजर साठी ओपन करण्यात येणार आहे. काही काळानंतर फेसबुक मध्ये बरेच बदल आणि फीचर्स देखील अपडेट करण्यात येणार आहे.