टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आज काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक यासारखे बरेच ॲप्स यात येतात. व्हाट्सअप आल्यापासून फेसबुक(Facebook) फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजर चे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. फेसबुक या ॲपवर मोठ्या प्रमाणात युजर्स ऍक्टिव्ह असतात. हे युजर्स फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट, फोटो अपलोड, मेसेज साठी मेसेंजर चा वापर करतात. यासोबतच फेसबुक आणि instagram च्या माध्यमातून बरेच जण कंटेंट तयार करून पोस्ट किंवा व्हिडिओ अपलोड करतात. आणि यातून पैसे देखील कमवतात. बरेच जण फेसबुक च्या माध्यमातून मिळालेल्या लिंक वरून काही गोष्टी खरेदी देखील करतात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून फेसबुक वर एक स्कॅम सुरू आहे. या स्कॅम च्या माध्यमातून युजर्सचे बँक अकाउंट निकामी होऊ शकते.
काय आहे हा स्कॅम
गेल्या काही महिन्यांपासून फेसबुक वर नवीन स्कॅम सुरू आहे. हा स्कॅम लुक हु जस्ट डाईड या नावाने सुरु आहे. याचा मराठी अर्थ ‘बघा आता कोणाचा मृत्यू झाला.’ असा असून याला फिनिशिंग स्कॅम देखील आपण म्हणू शकतो. या स्कॅमच्या माध्यमातून एक लिंक युजर्स ला पाठवली जाते. आणि संपूर्ण खेळ सुरू होतो. या स्कॅम मध्ये बरेच युजर्स गुंतले असून हे अत्यंत गंभीर आहे.
हॅकर्स फेसबुक अकाउंट वर करतात कब्जा
फेसबुक वर सुरू असलेल्या या लुक हु जस्ट डाईड नावाच्या स्कॅमच्या माध्यमातून युजर्स ला एक लिंक दिली जाते. या लिंक वर युजर्सने क्लिक केल्यावर फेसबुकचे लॉग इन डिटेल्स मागितले जातात. आणि एकदा डिटेल्स एंटर केल्यावर युजर्सचे अकाउंट पूर्णपणे हॅक केले जाते. फेसबुक हॅक केल्यानंतर तुमची पर्सनल माहिती देखील हॅकर्सच्या माध्यमातून काढली जाते. ही माहिती मिळाली तर तुमचे बँक अकाउंट निकामी व्हायला वेळ लागत नाही.
अशाप्रकारे ऑनलाइन हॅकिंग पासून वाचू शकतात
तुम्हाला या ऑनलाइन हॅकिंग पासून वाचायचे असल्यास तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला सोशल मीडियावर यात व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या कोणत्याही माध्यमातून एखादी लिंक आली तर ती क्लिक करू नका. बऱ्याचदा लकी ड्रॉ असल्याचे सांगून तुम्हाला दहा हजारांचे किंवा दहा लाखाचे कुपन देणार असल्याचे सांगण्यात येते. आणि तुम्ही त्यांच्या बोलण्यात आल्यानंतर तुम्ही स्कॅमर चे शिकार हमखास बनतात. त्यामुळे चुकूनही कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका.
फेसबुक हॅक झाल्यावर लगेच करा हे
जर तुमचे फेसबुक अकाउंट हॅक झाले असेल तर तुम्ही फेसबुकवर असलेल्या हेल्प किंवा सपोर्ट सोबत अर्जंट संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात. यासोबतच तुम्हाला सायबर क्राईम च्या माध्यमातून एफ आय आर देखील नोंदवावा लागेल.