WhatsApp चॅटिंग होणार सोप्पं; कंपनीने केली मोठी घोषणा

टाइम्स मराठी । WhatsApp जे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. जगभरात व्हाट्सअपचे करोडो यूजर्स आहेत. भारतात सुद्धा जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप असतेच. आपल्या वापरकर्त्यांना आणखी चांगल्या सुविधा मिळाव्या आणि व्हाट्सअप वापरणे सोप्पं व्हावं म्हणून कंपनी सतत नवनवीन आणि अपडेटेड फीचर्स आणत असते. आताही व्हाट्सअप अशाच एका फीचर्सवर काम करत असून एकदा का हे फीचर्स लाँच झालं की यूजर्सना चॅटिंग करणं सोप्प पडणार आहे.

   

काय आहे हे फीचर्स ?

‘फेव्हरेट’ चॅट फिल्टर (Favorites’ chat filter) असं या नवीन लाँच होणाऱ्या फीचर्सचे नाव आहे. या फीचर्सच्या माध्यमातून यूजर्स त्यांचे आवडते चॅट्स वेगळ्या विभागात ठेवण्यास सक्षम असतील. हे फीचर सादर केल्यानंतर युजर्सना चॅटमध्ये वेगळा ‘Favourite’ चॅट फिल्टर मिळेल. सध्या या फीचरचे टेस्टिंग सुरु असून लवकरच हे यूजर्ससाठी रोल आऊट करण्यात येईल. रिपोर्टनुसार, हे त्या टेस्टर्स साठी उपलब्ध आहे ज्यांनी Google Play Beta प्रोग्रामद्वारे नोंदणी केली आहे. एकदा ते बीटामध्ये आल्यावर, हे वापरकर्ते हे फीचर्स पाहू शकतील.

WABetaInfo ने Android आवृत्ती 2.24.12.7 वर हे नवीन फीचर्स सर्च केलं आहे. ज्या लोकांना सतत कोणाचे ने कोणाचे मेसेज येत असतात आणि त्यामुळे महत्वाचे कान्टॅक्ट खाली खाली जातात त्या लोकांनाही हे फीचर्स बेस्ट ठरणार आहे. सध्या आपण महत्वाचे कॉन्टॅक्ट पिन करून ठेऊ शकतो, मात्र फक्त ३ च जणांना पिन करण्याचा पर्याय आहे. मात्र या नव्या ‘फेव्हरेट’ चॅट फिल्टर फीचरमुळे तुम्ही अनेकांना फेव्हरेट लिस्टमध्ये टाकू शकता. WABetaInfo ने असाही दावा केला आहे कि वापरकर्ते त्यांच्या आवडीनुसार चॅट हटवू शकतात आणि पुन्हा ऍडही करू शकतात. येत्या काही दिवसात बीटा यूजर्ससाठी हे फिचर लाँच करण्यात येईल.