Whatsapp मध्ये येणार ChatGPT प्रमाणे फीचर; कंपनीने केली मायक्रोसॉफ्ट सोबत पार्टनरशिप

टाइम्स मराठी । Whatsapp या इन्स्टंट मेसेंजर ॲप मध्ये Meta कंपनीकडून वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात येत आहे. Whatsapp चे संपूर्ण जगात करोडो लाखो युजर्स आहेत. Whatsapp मध्ये  बरेच फीचर्स ऍड करण्यात आले असून काही फीचर्स वर कंपनी काम करत आहे. आता Whatsapp मध्ये स्पेशल फीचर यूजर साठी उपलब्ध केले आहे. या नवीन फीचर्सच्या माध्यमातून युजर्स ला चॅट बॉक्समध्ये AI फीचर्स पर्यंत पोहोचण्याची सुविधा मिळेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चा वापर प्रत्येक अँप्समध्ये करण्यात येत आहे. आता हे आर्टिफिशियल इंटेलिजंट AI व्हाट्सअँप मध्ये देखील पोहोचल्याचे दिसून येतं.

   

काय आहे हे फीचर

Meta कंपनीने meta connect 2023 इव्हेंट मध्ये  व्हाट्सअप साठी AI CHATBOT लॉन्च करणार असल्याबाबत माहिती दिली होती. आता या फिचरची टेस्टिंग सुरू आहे. या फीचरच्या माध्यमातून  युजर्स ला चॅटमध्ये एक शॉर्टकट बटन मिळेल. हे शॉर्टकट बटन  AI CHATBOT ला क्विक ऍक्सेस करण्याची सुविधा देईल. WABETAINFO या वेबसाईट नुसार, इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हाट्सअपच्या चॅट बॉक्समध्ये युजर्स ला नवीन फिचर एक्सेस करता येऊ शकते. कंपनीने हे फीचर सध्या व्हाट्सअप बीटा युजर साठी उपलब्ध केले असून लवकरच सर्व युजर साठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

व्हाट्सअप मध्ये स्पेशल आयकॉन सह येईल हे फीचर

मिळालेल्या माहितीनुसार, AI ChatBot फीचर व्हाट्सअपच्या चॅट सेक्शन मध्ये सर्वात वर  देण्यात येईल. या फीचरच्या मदतीने यूजर्स ला काही ट्रान्स पूर्ण करण्यास मदत होईल. हे एआय फीचर  नवीन आयकॉन सह उपलब्ध करण्यात येऊ शकते. या chatbot मध्ये कंपनीकडून बरेच फीचर्स देण्यात येणार आहे. Whatsapp चे हे नवीन फीचर ChatGPT, Bard, Bing प्रमाणे काम करेल.

कंपनीने मायक्रोसॉफ्ट सोबत केली पार्टनरशिप

या नवीन फीचर्स साठी मेटा कंपनीने मायक्रोसॉफ्ट सोबत पार्टनरशिप केली आहे. जेणेकरून मेटाच्या AI चॅटबॉटला अप्रतिम बनवण्यास मदत होईल. यासोबतच युजर्स ला  midJourney, Bing Image Creator प्रमाणे फोटो जनरेट करण्यासाठी हे फीचर मदत करेल. याबाबत मार्क झुकेरबर्ग यांनी इव्हेंट वेळी माहिती दिली होती. आता हे नवीन फीचर युजरसाठी अप्रतिम आणि सर्वात खास ठरू शकते.