Ferrari Electric Car : फेरारी लाँच करणार Electric Car; किंमत वाचून बसेल धडकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ जगभरात वाढली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात पेट्रोल डिझेलचा खरंच वाचवण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती दाखवत आहेत. वाढत्या मागणीमुळे अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आणत आहेत. आत्तापर्यंत टाटा, महिंद्रा यांसारख्या बड्या कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात सादर केल्याचं आहेत, आता जगातील प्रसिद्ध इटालियन कंपनी Ferrari आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Ferrari Electric Car) बाजारात लाँच करणार आहे. 2025 च्या अखेरीस फेरारीची इलेक्ट्रिक कार आपल्याला पाहायला मिळेल.

   

किंमत किती असेल ? Ferrari Electric Car

फेरारी कंपनी हि लक्झरी कार बनवण्यासाठी जगभरात ओळखली जाते. आत्तापर्यंत अनेक आकर्षक आणि सर्वाना हव्याहव्याशा वाटणाऱ्या गाड्या कंपनीने बाजारात आणल्या आहेत. आता कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंट मधेही उतरली असल्याने इतर ब्रँडेड कंपन्यांना तगडी फ़ूट मिळण्याची शक्यता आहे. फेरारीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या किमतींबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही मात्र इटलीमध्ये फेरारीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची किंमत किमान 500,000 युरो (सुमारे $535,000/INR 4.46 कोटी) असण्याची शक्यता आहे. लक्झरी वाहन उत्पादक कंपन्या या कार मॉडेलसाठी प्लांट उभारण्याच्या तयारीत आहेत.

फेरारीची इलेक्ट्रिक कार (Ferrari Electric Car) पुढील वर्षी म्हणजेच २०२५ च्या अखेरीस जागतिक बाजारपेठेत दाखल होऊ शकते. या कारची संभाव्य किंमत दर्शवते की या कारच्या खरेदीदारांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. फेरारीचा नवा प्लांट कुठे उभारला जाईल याबाबत कंपनीने काहीही माहिती दिलेली नाही मात्र उत्तर इटलीमधील मारानेलो येथे हा इलेक्ट्रिक गाड्यांचा प्लांट उभारण्यात येऊ शकतो. फेरारी आपल्या पेट्रोल आणि हायब्रीड कारचे उत्पादन मारॅनेलो येथे उभारल्या जाणाऱ्या नवीन प्लांटमध्ये करू शकते. तसेच या प्लांटमध्ये आगामी नवीन इलेक्ट्रिक कार देखील बनवता येतील.