टाइम्स मराठी । आपण आपल्या गाडीने चांगले मायलेज द्यावे म्हणून गाडीची पूर्णपणे काळजी घेतो. वेळेवर गाडीची सर्विसिंग करणे, टायर मध्ये हवा परफेक्ट भरणे, गाडीमध्ये रोज पेट्रोल टाकने एवढेच नाही तर आवश्यक तेव्हा ब्रेक लावणे, कमी स्पीड मध्ये गाडी चालवणे या सर्व गोष्टींची आपण काळजी घेतो. तरीही सर्व काही व्यवस्थित असून देखील गाडी मायलेज देत नाही. यावर आता सोशल मीडियावर एक अफवा पसरत आहे. ही अफवा खरी की खोटी हे आपण आज जाणून घेणार आहे.
या अफवेनुसार, सकाळी किंवा रात्री पेट्रोल आणि डिझेल भरले तर जास्त फायदा मिळतो. आणि गाडीचे मायलेज देखील वाढते. या अफवे मागील तर्क असा आहे की, सकाळी आणि रात्री कमी तापमानामुळे पेट्रोल आणि डिझेलची घनता चांगली असते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल मोठ्या प्रमाणात मिळते. दिवसभरात जास्त उष्णतेमुळे इंधनाची घनता कमी असते त्यावेळी पेट्रोल आणि डिझेल योग्य प्रमाणात मिळत नाही. म्हणूनच बऱ्याचदा सकाळी आणि संध्याकाळी पेट्रोल पंपावर जास्त प्रमाणात गर्दी दिसत असते. परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही अफवा सपशेल खोटी असल्याचं सांगितलं आहे.
तुम्ही तुमच्या कार मध्ये केव्हाही पेट्रोल भरलं तरी तुम्हाला तेवढीच घनता असलेले पेट्रोल किंवा डिझेल मिळेल. उष्णतेचा कोणताच परिणाम घनतेवर पडत नसतो. जर घनतेमध्ये काही फरक आढळत असेल तर सकाळ किंवा रात्री सोबत त्याचा काहीही संबंध नाही. पण जर तुम्हाला ही घनता कमी जास्त प्रमाणात वाटत असेल तर तुम्ही पेट्रोल टाकत असलेल्या पंपाकाकडून तुम्हाला फसवण्यात येत आहे.
किती असावी पेट्रोल – डिझेलची घनता
सरकारच्या म्हणण्यानुसार पेट्रोलची घनता 730 ते 800 आणि डिझेलची घनता 830 ते 900 किलो प्रति घनमीटर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सरकारकडून जर सवलतींवर पेट्रोल मिळत असेल तर ते पूर्णपणे शुद्ध आहे. त्याचबरोबर फिलिंग स्टेशनवर पेट्रोल डिझेलच्या टाक्या या अंडरग्राउंड असतात. आणि अंडरग्राउंड असल्यामुळे त्यांची घनता पहिल्यापासून कमीच असते. त्यामुळे दिवसा आणि रात्रीचा पेट्रोल डिझेलच्या घनतेशी काहीही संबंध येत नाही.