अखेर प्रतीक्षा संपली! iphone 15 झाला लॉन्च; पहा किमत आणि फिचर्स

TIMES MARATHI | अँपल कंपनीचा iphone 15 ॲपलच्या लाईव्ह इव्हेंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार याची प्रतीक्षा सर्व ग्राहकांना लागली होती. अँपल हा भारतातील तरुणांचा आवडता ब्रांड आहे. iphone 15 12 सप्टेंबर रात्री 10.30 वाजता हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. iphone 15 सोबतच iphone 15 plus, iphone 15 pro, iphone 15 pro max यासारखे चार मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत.

   

iphone 15 फिचर्स

iphone 15 मध्ये यावर्षी वेगवेगळे फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये बिल्ड इन फाइंड माय डिवाइस, नॉईज कॅन्सलेशन , फाईन माय व्हॉइस, SOS आणि सॅटॅलाइट कॉलिंग यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. ॲपल कंपनीने आयफोन 15 मध्ये रोडसाइड असिस्टंट फीचर देखील उपलब्ध करून दिले आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्स सॅटॅलाइट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून मेसेज पाठवू शकतात. हे सॅटॅलाइट कनेक्टिव्हिटी फीचर्स कंपनीकडून दोन वर्षासाठी फ्रीमध्ये देण्यात येणार आहे.

iphone 15 किंमत

कंपनीने iphone 15 मध्ये वेगवेगळ्या स्टोरेज ऑप्शनसह किमती लॉन्च केल्या आहे. त्यापैकी iphone 15 च्या 128 जीबी स्टोरेज असलेल्या आयफोन ची किंमत 79,900 रुपये आहे. त्याचबरोबर 256 जीबी स्टोरेज असलेल्या आयफोनची किंमत 89,900 रुपये आहे. तर 512 जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध असलेल्या आयफोनची किंमत 1,09,900 रुपये एवढी आहे.

iphone 15 pro आणि plus ची किंमत

त्याचबरोबर iphone 15 प्लसच्या 128 जीबी स्टोरेजची किंमत 89 हजार 900 रुपये आहे. 256 जीबी स्टोरेजची किंमत 99,900 आहे. 512 जीबी स्टोरेज आयफोनची किंमत 1,19,900 एवढी आहे. iphone 15 pro च्या 128 जीबी आयफोन ची किंमत 1,34,900 एवढी आहे. 256 जीबी स्टोरेज ची किंमत 1,44,900 रुपये आहे. आणि 512 जीबी स्टोरेज ची किंमत 1,64,900 रुपये आहे. जर तुम्हाला आयफोनचे स्टोरेज आणखीन वाढवायचे असेल तर 1TB स्टोरेज ची किंमत 1,84,900 रुपये आहे.

iphone 15 pro max किंमत

आयफोनच्या iphone 15 pro max या मॉडेलच्या 512 जीबी स्टोरेजची किंमत 1,79,900 एवढी असून 256 जीबी स्टोरेजची किंमत 1,59,900 एवढी आहे. आणि 1TB स्टोरेज ची किंमत 1,99,900 एवढी आहे.

iphone 15 स्पेसिफिकेशन

iphone 15 मध्ये 6.1 इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले ॉचे रिजॉल्युशन 2532×1170 पिक्सेल एवढे आहे. iphone 15 प्लस यामध्ये 6.7 इंच डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले 2778×1284 पिक्सेल रिझोल्युशन प्रदान करतो. त्यानुसार iphone 15 प्लसची साईज मोठी आहे. यामध्ये डायनामिक आयलँड फीचर्स उपलब्ध आहे. या मॉडेल मध्ये 2000 नीट्स ब्राईटनेस आणि IP68 रेटिंग देण्यात आली आहे.

iphone 15 चिपसेट

iphone 15 च्या सर्व मॉडेल्स वर USB टाईप C चार्जर देखील कंपनीकडून देण्यात येणार आहे . यापूर्वी चार्जिंगसाठी कंपनीचा प्रोपर्टी चार्जर वापरण्यात येत होता. परंतु आता कोणताही अँड्रॉइड चार्जरने चार्ज करता येऊ शकतो. iphone 15 आणि iphone 15 plus या दोन्हींमध्ये A16 Bionic चिपसेट उपलब्ध आहे.

iphone 15 कॅमेरा सेटअप

iphone 15 यामध्ये नवीन कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 MP, फोकल लेंथ 28 mm, 12 MP टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. कंपनीने या कॅमेरा मधील नाईट मोड आणि पोट्रेट मोड मध्ये बरेच बदल केले आहे. आयफोन 15 हा पिंक, ब्लॅक, ब्ल्यू आणि येलो आणि प्रो मॉडेल्स ग्रे, ब्लॅक, ब्ल्यू आणि व्हाईट कलर ऑप्शन मध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या आयफोनची विक्री 22 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर 15 सप्टेंबर पासून प्री बुक देखील करू शकतात.