Whatsapp वर जुने मेसेज शोधणं होणार सोप्प; लवकरच दिसणार कॅलेंडरचा ऑप्शन

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेंजर म्हणून सुरुवातीला ओळख असलेल्या Whatsapp ला आता नवीन ओळख मिळत आहे. Whatsapp वरून चॅटिंग करणे आता मजेशीर झाले असून आता Whatsapp च्या माध्यमातून ऑफिशियल आणि प्रायव्हेट कामे सुद्धा होतात. हे जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. Whatsapp वर दोन मिलियन पेक्षा जास्त ऍक्टिव्ह युजर्स असून कंपनी यामध्ये सातत्यानं नवनवीन फीचर्स ऍड करत असते. आता Whatsapp लवकरच एक नवीन फीचर्स आणणार आहे. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जुने चॅटिंग अगदी लगेच शोधू शकणार आहात.

   

काय आहे हे फीचर?

Whatsapp लवकरच लॉन्च करत असलेल्या नवीन फीचर्सच्या माध्यमातून युजर्सला जुने चॅटिंग शोधण्यामध्ये मदत होईल. व्हाट्सअप लवकरच चॅटिंगच्या सर्च बारमध्ये कॅलेंडर सुविधा उपलब्ध करणार आहे. त्यानुसार यूजर्स whatsapp मध्ये तारखेनुसार चॅटिंग शोधू शकतात. म्हणजेच ज्या तारखेची चॅटिंग युजर्स ला हवी आहे ती तारीख टाकून युजर्सला चॅटिंग शोधता येईल. यामुळे तुम्हाला तुमचे जुने चॅटिंग किंवा मेसेज शोधणे सोपे होईल.

अशा पद्धतीने करेल काम

Wabetainfo या वेबसाईट नुसार,सध्या या फीचर वर काम सुरू असून याहे डेव्हलपिंग सुरू आहे. लवकरच हे फीचर यूजर साठी रोल आऊट करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर या फिचरचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला. या स्क्रीनशॉट नुसार व्हाट्सअप मेसेज शोधण्यासाठी कॅलेंडर बटन दिसत आहे. त्यानुसार या बटनवर क्लिक केल्यानंतर युजरला ज्या तारखेची चॅट हवी आहे ती तारीख सिलेक्ट करावी लागेल. त्यानंतर डिस्प्ले वर त्यांना हवी असलेलं चॅट दिसेल.