Fire-Boltt Royale स्मार्टवॉच लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । Fire-Boltt कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मेटॉलिक बॉडीमध्ये नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. नुकतच कंपनीने  वियरेबल्स सेगमेंट मध्ये तिसरा क्रमांक पटकावला असून यामध्ये बरेच फीचर्स ऍड केले आहे. त्यानुसार या वॉच मध्ये फिरणारा क्राऊन देण्यात आला आहे. Fire-Boltt Royale असे या स्मार्टवॉचचे नाव असून कंपनीने हे स्मार्टवॉच गुलाबी गोल्ड, गोल्ड, ब्लॅक, ब्ल्यू, सिल्वर कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केले आहे. आज आपण या या स्मार्टवॉच चे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन

Fire-Boltt Royale या स्मार्टवॉचमध्ये कंपनीने 1.43 इंचचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा ऑल्वेज ऑन डिस्प्ले सपोर्ट सह येतो. हा डिस्प्ले 466 × 466 पिक्सेल रिझोल्युशन ऑफर करतो. त्याचबरोबर हा डिस्प्ले 750 nits पीक ब्राईटनेस देतो. कंपनीने या स्मार्टवॉचची क्वालिटी आणि स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी ऑल मेटल बिल्ड वापरले आहे. या स्मार्टवॉच मध्ये उपलब्ध असलेले क्राऊन  हे फंक्शनल रोटेटिंग क्राऊन आहे. हे स्मार्टवॉच फंक्शनल रोटेटिंग क्राऊन आणि एडिशनल बटनाचा वापर करून कंट्रोल करता येऊ शकते.

फिचर्स

Fire-Boltt Royale या स्मार्टवॉच मध्ये 130 पेक्षा जास्त वॉच फेसेस देण्यात आले आहे. अप्रतिम स्टोरेज कॅपॅसिटी, म्युझिक सेव ऑप्शन यामध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या स्मार्टवॉच मध्ये 4GB ॲडिशनल स्टोरेज दिले आहे. या स्टोरेज मध्ये म्युझिक स्टोअर देखील उपलब्ध करण्यात आले आहे. याच स्मार्टवॉच मध्ये ब्लूटूथ कॉलिंग, कॉन्टॅक्ट, हिस्ट्री सिंक यासारखे फीचर्स मिळतात. हेल्थ च्या बाबतीत बोलायचं झालं तर स्मार्टवॉच मध्ये हेल्थ सूट SpO2, महिलांसाठी मंथली सायकल, हार्ट रेट हे फीचर्स देण्यात आले आहे.

किंमत किती?

Fire-Boltt Royale या स्मार्टवॉच ची किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही हे स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी हा अप्रतिम पर्याय ठरू शकतो. कारण या स्मार्टवॉच मध्ये बरेच फीचर्स उपलब्ध आहेत. तुम्ही हे स्मार्टवॉच अमेझॉन इंडिया, Fire Boltt इ स्टोर वरून खरेदी करू शकता. 25 नोव्हेंबर पासून या स्मार्टवॉच ची विक्री सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय कंपनीने स्मार्टवॉच वर 250 रुपयांची सूट दिली आहे.